Chhatrapati Sambhajinagar Crime : धक्कादायक! महिला कीर्तनकाराला आश्रमात दगडाने ठेचून संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात महिला कीर्तनकारची आश्रमात दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : वैजापुरातील (vaijapur) एका आश्रमात महिला कीर्तनकार ह.ब.प. संगीताताई महाराज (Sangitatai Maharaj) यांची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहेत. वैजापुरातील एका आश्रमात संगीताताई महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हत्येचे कारण अस्पष्ट
हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार? हे पाहणे महात्त्वाचे ठरणार आहे.
गुन्हेगाराचा दोघांवर जीवघेणा हल्ला
दरम्यान, हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या भावंडांनी पार्किंगमध्ये गाडी लावताना बाजूला सरका, असे म्हटल्याच्या रागातून खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी सौरभ वानखेडेसह तिघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. एकाच्या गळ्यावर कटरने वार करून जिवे मारण्याच्या प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि.23) रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या एन 1 भागातील हॉटेल एका हॉटेल समोर घडली आहे. फिर्यादी महेश किशोर वैष्णव हा त्याचा चुलत भाऊ दुर्गेशसोबत सिडको भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. पार्किंगमध्ये गाडी लावत असताना दुर्गेशने तेथे उभ्या अनोळखी तिघांना बाजूला सरका आम्हाला गाडी लावू द्या असे म्हटले. त्यावरुन आरोपींनी दोघांना शिवीगाळ करून बेदम मारहाण सुरु केली. एका आरोपीने तुम्हाला जीवे मारून टाकतो असे म्हणत महेशच्या गळ्यावर कटरने जीवघेणा वार केला. महेशने हात मध्ये घातल्याने हाताला जखम झाली. यानंतर पुन्हा आरोपीने पवार, पाठीवर वार करून जखमी केले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभ नानासाहेब वानखेडे याला अटक केली आहे.
आणखी वाचा
























