एक्स्प्लोर

Bipin Bafna Murder Case : बिपिन बाफना खून प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा, हत्येनंतर नऊ वर्षांनी न्याय 

Bipin Bafna Murder Case : 2013 साली झालेल्या बिपीन बाफना खून प्रकरणाचा उलगडा संशयितांच्या कॉल डिटेल्स वरून झाला. या प्रकरणी दोघा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

नाशिक : बिपिन बाफना खून प्रकरणी ( Bipin Bafna Murder Case) दोघा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. चेतन पगारे आणि अमन जट अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोघांची नावे आहेत. नाशिक जिल्ह्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहेत. या प्रकरणात पाच पैकी तीन आरोपींची मंगळवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली तर दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. 

2013 मध्ये बिपिन बाफना या तरुणाचे खंडणीसाठी अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हत्येनंतर साडेनऊ वर्षानंतर आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील अजय मिसर यांनी बाफना खून खटल्याचे सरकारतर्फे कामकाज पाहिले. 

Bipin Bafna Murder Case : काय आहे प्रकरणय

नाशिकमध्ये 2023 मध्ये एक कोटीच्या खंडणीसाठी (Extortion) बिपिन बाफना या मुलाचे अपहरण (Kidnap) करण्यात आले होते. अपहरणानंतर बिपिन याची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पाच आरोपंवर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.  जवळपास साडेनऊ वर्षे या प्रकरणी न्यायालयीन लढा सुरू होता.  मंगळवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन या गुन्ह्यातील दोघांना दोषी ठरविण्यात आले. तर तिघा संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यांनतर दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली.   8 जून 2013 रोजी मयत विपीन गुलाबचंद बाफणा हा डान्स क्लासला जाऊन येतो असे सांगून गेल्यानंतर त्याचे अपहरण करीत अज्ञात व्यक्तीने विपिनच्या मोबाईलवरून गुलाबचंद बाफना यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती.

Bipin Bafna Murder Case :  गुन्हा दाखल झाल्याने हत्या

अपहरणानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने संशयितांनी विपीन बाफना याची निर्घृण हत्या केली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून या हत्याकांडातील संशयित अमन जट, चेतन यशवंतराव पगारे, अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे, संजय रणधीर पवार, पम्मी भगवान चौधरी यांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अपहरण करून हत्या करण्याबाबत दाखल असलेला खटला न्यायालयात साडेनऊ वर्ष चालला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदविण्यात आले आहे.  
 

Bipin Bafna Murder Case :  असा झाला हत्येचा उलगडा 

2013 साली झालेल्या बिपीन बाफना खून प्रकरणाचा उलगडा संशयितांच्या कॉल डिटेल्स वरून झाला. तपासादरम्यान पोलिसांना एका मोबाईल नंबरवर संशय आल्याने तपासचक्र गतिमान करत मोबाईल सिमकार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याच्यापर्यंत पोलिस पोहचले. त्याची विचारपूस केली असता त्याने सिम त्याच्या नावावर आहे, मात्र वापर पंजाबच्या जालंधरमधील त्याची मेव्हणी करत असल्याचे सांगितले. परंतु जेव्हा ती नाशिकला येते तेव्हाच ती मोबाईल वापरते. तोपर्यत हा सिम त्याचा चुलतभाऊ संशयित अमन प्रकटसिंग जट वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित अमनला ताब्यात घेतल्यानंतर तो पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.   

महत्वाच्या बातम्या

आमदारांना फोन लावू का? चकरा मारुन 11 महिन्यांनी गुन्हा दाखल, बीड पोलिसांसमोर वृद्ध दाम्पत्य हतबल  

महत्त्वाच्या बातम्या

बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Sangli Crime News : 14 महिन्याच्या चिमुकलीवर कात्रीने वार करून संपवलं, मानसिक रुग्ण असलेल्या आईला अटक
14 महिन्याच्या चिमुकलीवर कात्रीने वार करून संपवलं, मानसिक रुग्ण असलेल्या आईला अटक
Custodial Death Compensation : कोठडीत मृत्यू झाल्यास 'इतके' लाख नुकसानभरपाई, दोषी पोलिसांच्या पगारातून होणार वसुली, सरकारचा मोठा निर्णय
कोठडीत मृत्यू झाल्यास 'इतके' लाख नुकसानभरपाई, दोषी पोलिसांच्या पगारातून होणार वसुली, सरकारचा मोठा निर्णय
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget