कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई, 1 किलो सोनं किंवा 1 किलो चांदी जप्त, एकूण 86 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) मोठी कारवाई केली आहे. दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद केली आहे.
Kolhapur Crime News : कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) मोठी कारवाई केली आहे. दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण 13 घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे. या टोळीकडून पोलिसांनी (Police) 1 किलो 200 ग्रॅम सोने, 1 किलो 430 ग्रॅम चांदी आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण 86 लाख 26 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्दे मला जप्त केला आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेली टोळी दिवसा घरफोडी करत होती. याचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. या पोलिसांकडून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात एकूण 13 घरफोड्या केल्याचे उघड केले आहे. अलिकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरटे दिवसा देखील घरफोडी करतना दिसत आहेत. त्यामुळं आशा घटना होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. दरम्यान, कोल्हापुरात पोलिसांनी चोरट्यांना अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामध्ये आणखी कोणी आहेत का? याचा तपास सुरु आहे. या प्रकारच्या चोरीच्या घटना होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे ते म्हणाले.