एक्स्प्लोर

Bhiwandi : धक्क्कादायक! लागोपाठ दोन अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार; हत्येच्या घटनांनी भिवंडी हादरली

Bhiwandi Crime news: दोन दिवसापूर्वीच एका तीन वर्षीय अल्पवयीन चिमुरडीला  मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या 26 वर्षीय नराधमाने घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

Bhiwandi Crime news: दोन दिवसापूर्वीच एका तीन वर्षीय अल्पवयीन चिमुरडीला  मोबाईल (Mobile) दाखवण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या 26 वर्षीय नराधमाने घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यापाठोपाठ आज पुन्हा अशीच धक्क्कादायक घटना भिवंडीतील नागांव परिसरात समोर आली असून एका तीन वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर पडीक इमारतीमध्ये अत्याचार करून हत्या करण्यात आल्याने भिवंडी शहर हादरले आहे. याप्रकरणी अज्ञात नराधमावर शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सूरु केला आहे. दरम्यान पोलिसांनी भिवंडीतील सर्व भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी मालकांना आवाहन केलं आहे, अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील पोलीस उपायुक्त यांनी सांगितले.

भिवंडी शहरातील नागांव परिसर खूपच दाटीवाटीच्या वस्तीतील परिसर आहे. याच परिसरात एका चाळीत मृतक चिमुरडी आईवडिलांसह भावंडासोबत राहत होती. त्यातच मंगळवारी सकाळच्या सुमारास मृतक चिमुरडीचे आईवडील कामावर गेले होते. तर मृतक चिमुरडी भावंडांसोबत घराच्या अंगणाबाहेर खेळत असतानाच, अचानक बेपत्ता झाली. आई वडील दुपारी 1 वाजल्याच्या सुमारास कामावरून घरी आले असता, मृतक चिमुरडी त्याला आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात व आजूबाजूला चौकशी करून तिचा शोध सुरू केला. मात्र सायंकाळ होत आली तरी तिचा शोध लागत नसल्याने आईवडिलांनी शांतीनगर पोलीस ठाणे गाठून चिमुरडी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

त्यावरून  पोलिसांनीही  चिमुरडीचा  शोध  सुरु  केला. यानंतर आज  सकाळच्या  सुमारास  तिच्या घरापासून जवळ असलेल्या एका धोकादायक पडीक इमारतीच्या पाहिल्या मजल्यावरील एका खोलीत तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना करून अधिक उत्तरणीय तपासणीसाठी आता मृतदेह मुंबईतील (Mumbai) जे जे रुग्णालयात (j j hospital ) पाठवला आहे. 

दरम्यान पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी  शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात नराधमाविरोधात अपहरण, पोक्सो व अत्याचारासह हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. मात्र लागोपाठ घडलेल्या या दोन्ही अत्याचार करून हत्येच्या घटनेमुळे भिवंडी हादरली आहे.

हेही वाचा: 

आता भारतीय जवान 'Iron Man' सारखे झेपावणार; लष्कराकडून हवेत उडू शकणाऱ्या जेटपॅकची सूटची ऑर्डर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget