एक्स्प्लोर

आता भारतीय जवान 'Iron Man' सारखे झेपावणार; लष्कराकडून हवेत उडू शकणाऱ्या जेटपॅकची सूटची ऑर्डर

Indian Army Jet Pack Suit: सैन्याला ही अत्याधुनिक यंत्रसामुग्री मिळाल्यानंतर भारतीय जवानांची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. लष्कराने ही अद्ययावत यंत्र खरेदी करण्यासाठी फास्ट्रॅक खरेदी तंत्राचा अवलंब केला आहे.

Indian Army Jet Pack Suit: भारतीय लष्कर (Indian Army) आता हायटेक होत आहे. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री खरेदी करण्याची प्रक्रिया संरक्षण मंत्रालयाने सुरु केली आहे.  भारतीय सैन्याला अद्ययावत तंत्रसज्ज करण्यासाठी आवश्यक जेटपॅक सूट किंवा रोबो, ड्रोन यांच्या खरेदीसाठी निविदा (Tenders For Jetpack Suits And Robotic Mules) जारी केल्या आहेत. यामध्ये जवानाला ताशी 50 किमीच्या वेगाने हवेत उडण्यासाठी 48 जेटपॅक, अडीअडचणीच्या दऱ्याखोऱ्यातील ठिकाणी पोहोचण्यासाठी चार पायांचे 100 रोबोटिक म्यूल आणि तब्बल 130 शस्त्रसज्ज ड्रोनचा (Drone Systems) समावेश आहे. 

सैन्याला ही अत्याधुनिक यंत्रसामुग्री मिळाल्यानंतर भारतीय जवानांची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. लष्कराने ही अद्यावत यंत्र खरेदी करण्यासाठी फास्ट्रॅक खरेदी तंत्राचा अवलंब केला आहे. यामुळे नेहमीच्या शस्त्रास्त्र खरेदीत होणारी दिरंगाई टाळली जाणार आहे. लष्कराला या यंत्रसामुग्रीचा पुरवठा झाल्यानंतर भारतीय सैन्य हॉलीवूडच्या सिनेमातील हिरोप्रमाणेच सहसा अनाकलनीय वाटणाऱ्या मोहीमा लीलया पार पाडू शकणार आहे.   

48 जेटॅपॅक, 100 रोबोटिक म्यूल आणि 130 ड्रोन या सामुग्रीची खरेदी ही फक्त फास्टट्रॅक होत नाही तर स्वदेशी उत्पादकाकडून केली जाणार आहे.  भारतीय लष्कराला अपेक्षित जेटपॅक आधुनिक प्रॉपल्शन सिस्टीम (Modern Propulsion System) तसंच सर्व दिशांना झेपावण्यासाठीची आवश्यक नेव्हीगेशनने सज्ज असतील. 

भारतीय लष्कर खरेदी करणार असलेल्या ड्रोनचा उपयोग दूरवरच्या टेहाळणीसाठी होणार आहे. तर जेटपॅक परिधान करुन भारतीय जवान संशयास्पद असलेल्या ठिकाणाचा हवेतून आढावा घेण्यासाठी सज्ज होणार आहे. या जेट पॅकची क्षमता ताशी 50 किमीच्या वेगाने हवेत उडण्यासाठी पुरेशी असणार आहे. तसंच चार पायांच्या रोबोटिक म्यूलच्या सहाय्याने जिथे सैनिकला सहजासहजी अवजड दारुगोळा किंवा अन्य सामुग्री पोहोचवण्यात अडचणी येतात. तिथेही मनुष्यहानी न होता सामुग्री पोहोचवणं शक्य होणार आहे. एवढंच नाही तर हे रोबोटिक म्यूल समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट उंचीवरही काम करण्यास सक्षम असतील. 

आज सियाचीन ग्लेशियर किंवा त्यासारख्या दुर्गम ठिकाणी सामान्य सैनिकास तैनात करणं हे एक आव्हानच असतं अशा ठिकाणी अशी रोबोटिक यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यामुळे भारतीय सैन्याची मोठी सोय होणार आहे, तसंच त्यांच्या लढण्याच्या क्षमतेतही मोठी वाढ होऊ शकते.  आज जारी करण्यात आलेल्या या निविदांची मुदत 14 फेब्रुवारीपर्यंत आहे. म्हणजे उत्पादकांना 14 फेब्रुवारीपर्यंत आपले देकार संरक्षण मंत्रालयाला कळवायचे आहेत. 

काश्मीरमध्ये असेलली एलओसी (LOC) म्हणजे नियंत्रण रेषा किंवा भारत चीन यांच्यातील प्रत्यक्ष ताबा रेषा यावर अलीकडच्या काळातील हिंसक चकमकीत वाढ झालीय. अशा ठिकाणी अशी अद्ययावत तंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यावर भारतीय सैन्यासाठी ही मोठी उपलब्धी असेल.  सध्या जेटपॅक, ड्रोन किंवा रोबोटिक म्यूल्स अशी अद्ययावत तंत्रसामुग्रीची सज्जता फक्त अमेरिका आणि ब्रिटनच्या रॉयल मरीनकडेच असल्याचं सांगितलं जातं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 25 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सManikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?Zero Hour Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायचंय?Zero Hour : चाणाक्ष नेते,उत्तम वक्ते,लाडके राज्यकर्ते; Atal Bihari Vajpayee सारखा नेता होणे नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
Embed widget