घरातील 2 बायका, 3 पुरुष, अख्ख कुटुंब दरोडेखोर; सोनं चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड
छत्तीसगडच्या बिलासपुर येथील तीन दुकानदारांची फसवणूक करून हातचलाखीनं तेथील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने घेऊन पळालेल्या आंतरराज्यीय टोळीला भंडाऱ्यात नाकाबंदी करून अटक केली.

भंडारा : देशभरात आखिती म्हणजेच अक्षय्य तृतीयेचा (Akshaya tritiya) सण साजरा होत असून सोन्याच्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे सोनं (Gold) खरेदीचा मुहूर्त असताना दुसरीकडे भंडारा पोलिसांनी सोनं चोरणारी टोळी गजाआड केली आहे. विशेष म्हणजे या टोळीत दोन महिलांचाही समावेश असल्याचे पाहायला मिळते, तर सर्व आरोपी एकाच कुटुंबातील असल्याने पोलिसांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. या दरोडेखोरांनी आत्तापर्यंत कुठं-कुठं चोरी केली, दरोडा टाकला त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
छत्तीसगडच्या बिलासपुर येथील तीन दुकानदारांची फसवणूक करून हातचलाखीनं तेथील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने घेऊन पळालेल्या आंतरराज्यीय टोळीला भंडाऱ्यात नाकाबंदी करून अटक केली. भंडाऱ्याच्या कारधा पोलिसांनी ही कारवाई करताना भिलेवाडा येथील एका पेट्रोल पंपावर कारमधून आलेल्या या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हे उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथील असून त्यांच्या ताब्यातून 312 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 3 हजार 400 ग्राम चांदीचे दागिने, 94 हजार 828 रुपये रोख रखमेसह या चोरीसाठी वापरलेली कार असा एकूण 14 लाख 56 हजार 828 रुपयांचा मुद्देमाल कारधा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सराफा दुकानावर हात साफ करणाऱ्या आरोपींमध्ये एकाचं कुटुंबातील पाच आरोपी असून त्यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा सहभाग आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आरोपींना उद्या न्यायलयात हजर केले जाणार आहे.
अक्षय तृतीयेला सोनं खरेदीचा मुहूर्त
हिंदू धर्मग्रंथानुसार, वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) म्हटलं जातं. या दिवशी सूर्य आणि चंद्र आपल्या उच्च राशीत स्थित असतात. अक्षय्यचा अर्थ कधीच क्षय न होणारा. या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच, सोन्याच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची देखील खरेदी केली जाते. या दिवशी दान करण्याला देखील महत्त्व आहे. त्यानुसार, आज सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता आहे ते जाणून घेऊयात.
हेही वाचा
तीन वर्षाचं लिव्ह इन रिलेशनशीप, 3 मिनटांत सगळं संपलं; प्रियकराच्या क्राइम ब्रँचने आवळल्या मुसक्या
कोळीवाड्यातल्या प्रथमेशने करुन दाखवलं; UPSC परीक्षा उत्तीर्ण, सायनच्या लेकाची निघाली जंगी मिरवणूक























