एक्स्प्लोर

कोळीवाड्यातल्या प्रथमेशने करुन दाखवलं; UPSC परीक्षा उत्तीर्ण, सायनच्या लेकाची निघाली जंगी मिरवणूक

युपीएससी परीक्षेसाठी गेल्या 3 वर्षाचा हा प्रवास होता, आतापर्यंत जे केले त्याचा निकाल लागला. पॉलिटिकल साइंसमधून आणि हिस्ट्रीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

मुंबई : मेंढपाळाचा लेक युपीएससी परीक्षेतून (UPSC) आयपीएस झाल्यानंतर सोशल मीडियावर बिरुदेव डोणेच सगळीकडे झळकत होता. आता, कोळीवाड्यातील एका लेकानेही युपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईच्या सायन कोळीवाड्यात राहणाऱ्या प्रथमेश बोराडे याने देशात 926 वा क्रमांक पटकावत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. प्रथमेशचे कुटुंब हे मुंबईतील (Mumbai) दाटी वाटीच्या सायन कोळीवाड्यात राहत असून वडील सुंदर बोराडे हे मागचे 30 वर्षे महाराष्ट्र पोलीस दलात हवालदार म्हणून सेवा देत आहेत, तर आई मराठी शाळेत शिक्षिका आहे. प्रथमेशच्या यशाने कुटुंबात वेगळा आनंद पाहायला मिळत आहे. आई-वडील आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानत अभ्यास करून हे यश संपादन केल्याचे प्रथमेश बोराडे यांनी म्हंटल. मी एक दिवस माझ्या पोराला सल्यूट मारेल असे प्रथमेशच्या वडिलांचे मत होते, युपीएससीच्य निकालाने तो दिवस उजाडला, माझं स्वप्न पूर्ण झालं, असे सुंदर बोराडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.  

युपीएससीसाठी गेल्या 3 वर्षाचा हा प्रवास होता, आतापर्यंत जे केले त्याचा निकाल लागला. पॉलिटिकल साइंसमधून आणि हिस्ट्रीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. पहिल्यावेळी अभ्यास कमी पडला, दुसऱ्यांदा काही सुटले पण तिसऱ्यावेळी सगळ्या तयारीने समोर गेलो. माझे आई वडील आणि बाबसाहेब आंबेडकर हे माझे आदर्श तर इतिहास वाचत असताना आपले लीडर माझे आदर्श राहिले आहेत. प्रयत्न करत राहा, यातून निकाल मिळेल युपीएससीमुळे तुम्ही सुजाण नागरिक होतात तुम्ही एक चांगले नागरिक म्हणून पुढे येत राहा, असे प्रथमेशने म्हटले. मी मुंबईत अभ्यास केला, नंतर बार्टी या संस्थेकडून मला अनुदान देण्यात आले, दिल्लीत खूप मदत झाली तिथे रिसोर्स जास्त आहेत. मुंबईत ते रिसोर्स कमी आहेत, त्यामुळे दिल्लीत मला मोलाची मदत झाली. माझ्या आई वडिलांनी मला मुलाखतीसाठी मदत केली, मुलाखत ही चांगली कशी होऊ शकते हे ते नेहमी सांगत होते. सुरुवातीलाच क्लिअर करायचा माझा प्रयत्न होता. आता, जे केडर मिळेल किंवा स्टेट मिळेल त्यात आपण आपले बेस्ट द्यायचे, वुई आर सिव्हिल सर्व्हंट  फॉर अवर कंट्री, आपल्याला देश सेवेसाठी कार्यरत व्हायचं आहे, असेही प्रथमेश याने म्हटले. दरम्यान, प्रथमेशच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचं कौतुक होत असून सायन कोळीवाड्यात जंगी मिरवणूक काढत त्याचे अभिनंदन करण्यात आले. 

तिसरीत असताना लिहिला निबंध

मी आनंदी आहे त्याने खूप मेहनत आणि यश संपादन केले आहे. ज्या ज्या वेळी त्याचे मॉक व्हायचे त्याचे व्हिडिओ तो आम्हाला पाठवायचा आणि मग आम्ही त्याला काही गोष्टी सांग्याचो आणि तो दरवेळी त्यात इम्प्रूव करायचा. इयत्ता तिसरीत असताना प्रथमेशने निबंध लिहिला होता की, मला आयपीएस व्हायच आणि त्याच स्वप्न आम्ही पूर्ण केले, अशी आठवण त्याच्या आईने एबीपीशी बोलताना सांगितली.  

मी त्याला सॅल्यूट मारेल

एका वडिलांसाठी आणखी काय पाहिजे, ज्या विभागात कामाला आहे त्या विभागात तो येणार आहे. माझे स्वप्न होते की त्याला मी सॅल्यूट मारेल. आम्ही सामान्य कुटुंबातून काबाड कष्ट करत इथपर्यंत आलो आहे. मी 30 वर्षे पोलीस खात्यात सर्व्हिस देत आहे. मी नेहमी प्रथमेशला सांगितले, काहीतरी वेगळे जगूया, किड्या मुंग्याचे जीवन सगळे जगतात. काही तरी वेगळे जगले पाहिजे. मी त्याचा मित्र म्हणून त्याच्यासोबत जगलो आणि त्याला गोष्टी सांगितल्या आणि तो त्यावर राहिला. एक अंधेरी वाट होती, त्यावर प्रकाश आला. 22 तारखेला निकाल लागला, त्यानंतर आनंद झाला, असे प्रथमेशचे वडिल सुंदर बोराडे यांनी म्हटलं. 

हेही वाचा

जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी, पण...; बांठिया आयोगाचा उल्लेख, मनोज जरांगे स्पष्टच बोलले

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar NCP Probable Candidate List BMC Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?
Jaykumar Gore: 'काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,' जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले
'काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,' जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले
Akola crime: आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही लैंगिक शोषण केलं, अकोल्यातील संतापजनक घटना
आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही लैंगिक शोषण केलं, अकोल्यातील संतापजनक घटना
Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा

व्हिडीओ

Navi Mumbai airport first flight : नवी मुंबई विमानतळ सेवेत, पहिलं विमान हवेत Special Report
Tara Tiger : ताडोबातून आलेल्या ताराचा सह्याद्रीत मुक्त संचार Special Report
Nashik BJP VS Shiv Sena Thackeray :  आयारामांचं संकट? नाशिक भाजपात कटकट! Special Report
Sayaji Shinde Vanrai : सयाजींच्या वनराईवर कुणाची वाकडी नजर? Special Report
Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीतही घराणेशाहीचा दबदबा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP Probable Candidate List BMC Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?
Jaykumar Gore: 'काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,' जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले
'काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,' जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले
Akola crime: आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही लैंगिक शोषण केलं, अकोल्यातील संतापजनक घटना
आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही लैंगिक शोषण केलं, अकोल्यातील संतापजनक घटना
Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
Mhada Pune Lottery : म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल, अनामत रकमेच्या व्याजाचं काय असा सवाल 
म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल
Rohit Sharma : विराट कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video  
कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
Embed widget