एक्स्प्लोर

तीन वर्षाचं लिव्ह इन रिलेशनशीप, 3 मिनटांत सगळं संपलं; प्रियकराच्या क्राइम ब्रँचने आवळल्या मुसक्या

ठाकुर्ली येथे राहणाऱ्या सुभाष भोईर याचे मयत तरुणीशी प्रेम संबंध होते .यातूनच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

डोंबिवली :  प्रेम प्रकरणातून हत्या किंवा बलात्कारासारख्या गंभीर घटना सातत्याने समोर येत आहेत. आता, डोंबवली (Dombivali) शहरातील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 तारखेला एका इमारतीमधील घरात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी (Police) या प्रकरणी तपास सुरू केला, काल या मयत तरुणीच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर, कल्याण क्राईम ब्रांचने प्रियकर सुभाष भोईर याला कल्याण दुर्गाडी पुलाच्या परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. सुभाष भोईर हा या तरुणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही महिन्यांपासून या दोघांमध्ये व्यक्तिगत वाद सुरू होते, त्याच वादातून सुभाषने तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि तेथून पळ काढल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे कल्याण क्राईम ब्रांचने अवघ्या 20 तासात आरोपी सुभाषला बेडा ठोकल्या.

ठाकुर्ली येथील सुभाष भोईरचे मृत तरुणीशी प्रेमसंबंध होते, त्यातूनच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन वर्षापासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. 22 तारखेला या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला, त्यामुळे संतापलेल्या सुभाष भोईर याने या तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातून पळ काढला. याप्रकरणी घरात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करत पुढील तपास सुरू केला.

विशेष म्हणजे आठवडाभराने मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. कल्याण क्राईम ब्रँच देखील या प्रकरणी समांतर तपास करत होती. या तरुणीचा प्रियकर सुभाष भोईर याच्यावर कल्याण क्राईम ब्रांचला संशय होता. मात्र, सुभाष भोईर पसार झाला होता, अखेर तांत्रिक तपास व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुभाष भोईर हा कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी ब्रिजजवळ आल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा रचत सुभाष भोईर याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, सुभाष भोईर हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच कल्याण क्राईम ब्रँच पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा

83 फूट उंच, ब्रॉन्झ धातू; मालवण किल्ल्यावर उभारला शिवरायांचा नवा पुतळा, लोकार्पण कधी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Rohini Khadse : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसेंचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसे यांचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Beed : भररस्त्यात तरुणीनं थोबाडीत मारली, अपमान सहन न झाल्याने तरुणानं जीवन संपवलं; बीडमधील धक्कादायक घटना
भररस्त्यात तरुणीनं थोबाडीत मारली, अपमान सहन न झाल्याने तरुणानं जीवन संपवलं; बीडमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसेंचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसे यांचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Embed widget