![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Beed Parli Firing : परळीतील गोळीबार प्रकरणानंतर पोलीस अॅक्शन मोडवर; पैशांच्या वादातून सरपंचाच्या हत्येचा कट रचल्याचा संशय
Beed Parli Firing : बीडच्या परळी येथे झालेल्या गोळीबाराच्या (Beed Firing) घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वत: परळीत ठाण मांडून आहेत.
![Beed Parli Firing : परळीतील गोळीबार प्रकरणानंतर पोलीस अॅक्शन मोडवर; पैशांच्या वादातून सरपंचाच्या हत्येचा कट रचल्याचा संशय beed parli firing case update police on action mode Suspicion of conspiracy to kill sarpanch due to money dispute beed crime maharashtra marathi news Beed Parli Firing : परळीतील गोळीबार प्रकरणानंतर पोलीस अॅक्शन मोडवर; पैशांच्या वादातून सरपंचाच्या हत्येचा कट रचल्याचा संशय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a6d79deee03d32faf62f02796778d9c71719731651348892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Beed Parli Firing : बीडच्या परळी येथील बँक कॉलनीत रात्रीच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या (Beed Firing) घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांचा मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर झाले होते. या घटनेमुळे बीडसह राज्यात एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. परिणामी, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वत: परळीत ठाण मांडून आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला जातोय. या गुन्ह्यात चार संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून हे आरोपी अद्याप फरार आहेत.
या घटनेत एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 302, 307, आणि भारतीय हत्यार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. तसेच सदरील घटना पैशांच्या वादातून झाली, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येते आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच मारेकर्यांना अटक केली जाईल, असा विश्वासही पोलिसांनी बोलताना व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
परळीमध्ये रात्री झालेल्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. या गोळीबारामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृत झालेले बाबुराव आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर तिसरे जखमी महादेव गीते हे बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत. आता बाबुराव आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे.
घरी बोलावून झाडली डोक्यात गोळी
या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते. त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का? असे म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)