एक्स्प्लोर

Beed Crime: बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या धर्मांतर प्रकरण भोवलं; वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकांची अखेर उचलबांगडी

Beed Crime: बीडच्या कारागृहातील (Beed Jail) कैद्यांचे सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप असलेल्या आणि याच प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकाची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे.

Beed Crime: बीडच्या कारागृहातील (Beed Jail) कैद्यांचे सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप असलेल्या आणि याच प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकाची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांना उपाधीक्षक म्हणून नागपूरला पाठविण्यात आले आहे. बीड (Beed) कारागृहात आल्यापासून पेट्रस गायकवाड कायम वादग्रस्त ठरले होते. कारागृहातील झाडे तोडणे, कैद्यांकडून खाजगी कामे करून घेणे, यासोबतच पेट्रस गायकवाड वर सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कारागृहातील कैद्याच्या वकिलांनी तक्रारी देखील केल्या होत्या. अखेर शासनाने त्यांची उचलबांगडी केली आहे.

Gopichand Padalkar on Beed Jail : आमदार गोपीचंद पडळकरांचे अधीक्षकांवर गंभीर आरोप

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृह (Beed Jail) अधीक्षकांवर गंभीर आरोप केला होता. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकरांनी केला होता. या पाठोपाठ बीडच्या कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन (conversion) करण्यासाठी दबाव आणला जातो. त्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप बंदिवान कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केला होता. त्यांनतर बीडच्या कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्याने कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे गंभीर आरोप केले होते. यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परिणामी आता अखेर या प्रकारणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे

Beed Jail : वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकाची अखेर उचलबांगडी

दरम्यान, गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, बीडचे तुरुंग अधिकारी धर्मांतराचं काम करत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे. ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत. जेलमध्ये सगळे बायबलमधले श्लोक लिहिले आहेत. कैदी जेलमध्ये भजन, कीर्तन करायचे, ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकले आहे. तसेच तिकडे त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पादरी भेटायला येतो. कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा, तुम्हाला लाखो रुपये देतो अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत. बीडमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून त्याची चौकशी करावी आणि तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावं, अशी मागणी त्यांनी केली.

आणखी वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: दिल्लीतील स्फोटानंतर America सतर्क, नागरिकांसाठी Security Alert जारी.
Delhi Terror Plot : Faridabad मॉड्यूलचा हात? संशयित Dr. Umar आत्मघाती हल्ल्यात सामील असल्याचा संशयa
Delhi Blast : आत्मघाती हल्ल्याचा संशय, Delhi Police कडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Delhi Blast: i20 कारमध्ये स्फोट, घटनास्थळी शार्पनेल नाही, Delhi Police कडून 4 संशयित ताब्यात.
Delhi Car Blast: i20 कारचा मार्ग उघड, Haryana-Badarpur सीमेवरुन Delhi मध्ये एंट्री

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Embed widget