एक्स्प्लोर

Beed Crime news: 'वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड'; बीडमध्ये दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं

Beed Crime news: राम फटाले यांच्या वडिलांनी संबंधित सावकाराच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सावकर आपल्या मुलाला मारहाण करायचा असा आरोप त्यांनी केला.

Beed News: बीड जिल्ह्यात सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या घटनेत धक्कादायक बाब समोर आली आहेत. वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने मयत व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये 10 टक्के व्याजाने उसने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे करण्यात आली. मात्र, पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, असे म्हणत सावकाराने राम फटाले यांचा मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल असून तिघेजण अटकेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी डॉ.लक्ष्मण जाधव हा भाजपाचा पदाधिकारी आहे. जिल्ह्यात महिनाभरापूर्वीच सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती. ही प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकाने आत्महत्या केल्याने सावकारीचा प्रश्न समोर आला आहे. यासंदर्भात बीड पोलीस आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Beed Suicide News: राम फटाले यांचं डोळ्यात पाणी आणणारं पत्र

प्रिय आई आणि पप्पा
सुजय, गौरी आणि रेणुका

मी चांगला मुलगा, पती आणि वडील होऊ शकत नाही. तरी मला माफ करा. रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई-वडील, सुजय आणि गौरी यांची काळजी घ्यावी लागेल. शाम भाऊ लखन माझे मुले आणि बायको, आई-वडील यांना सांभाळा. मला माफ करा, तुम्हा सर्वांचा राम.

माझे आई-वडील यांच्याकडे माझ्या मातीसाठी पैसे नाहीत. माझी माती समाजाकडून वर्गणी काढून करावी. माझं दहावं, तेरावं आणि चौदावं करु नका. माझं वर्षश्राद्ध करु नका, ही माझी इच्छा आहे. रेणुका मी तुझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी देऊन जात आहे. तुला यापुढे खंबीरपणे सर्वांशी झगडावे लागेल. 

तुझा राम

Beed News: राम फटाले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात गंभीर आरोप

मी आत्महत्या करण्यास कारणीभूत असलेली व्यक्ती डॉ. लक्ष्मण जाधव व त्यांची पत्नी वर्षा जाधव आहेत. त्यांनी मला मानसिक त्रास दिला व माझा छळ केला. मी त्यांच्याकडून व्याजाने उसने रुपये घेतले होते. मी त्यांना रक्कम परत केली होती. पण माझे चेक बोर्ड परत दे म्हणालो अजून रक्कम दे. माझे बँक खाते, पत्नी आणि मुलीचे बँक खाते बँक ऑफ बडोदामध्ये आहे. साहेब त्यांच्याकडून सर्व रक्कम परत घेऊन माझ्या परिवाराला परत देण्यात यावी, ही नम्र विनंती. गेल्या सहा-सात वर्षांपासून मी त्यांना रक्कम देत आहे. तरी माझे बँक खाते तपासून रक्कम परत देण्यात यावी. ही आपणास विनंती. 

आणखी वाचा

निर्माल्य टाकण्यासाठी नदीच्या पुलावर कार थांबवली; क्षणात पत्नीने स्वत:ला झोकून देत जीवन संपवलं, पतीच्या डोळ्यादेखत दुर्दैवी अंत!

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget