Beed News : चक्क पिकअप व्हॅनला बांधून चोरट्यांनी पळवलेले एटीएम; पोलिसांनी 61 किमीचा पाठलाग करत परत आणली लाखोंची रक्कम
Beed Crime News : बीडच्या धारूर येथे एक चोरीची विचित्र घटना घडलीय. यात चोरांनी मोठ्या शिताफीने बँकेचे एटीएम मशीन अवघ्या 2 मिनिटात फोडले आहे. मात्र पोलिसांनी अवघ्या 4 तासात लाखोंची रक्कम परत आणलीय.
बीड : बीडच्या (Beed Crime) धारूर येथे एक चोरीची विचित्र घटना समोर आली आहे. यात चार चोरांनी मोठ्या शिताफीने एसबीआय बँकेचे एटीएम (ATM) मशीन अवघ्या 2 मिनिटात फोडले आहे. त्यानंतर ते इथवरच थांबले नाही तर त्यांनी त्यानंतर हे एटीएम मशीन पिकअपला बांधून पळवले. ही घटना शनिवारी घडली होती. तर ही एटीएम मशीन पळवून घेऊन जातानाचे संपूर्ण दृश्य परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) देखील कैद झाले होते. त्यानंतर हा घटनेची माहिती बँक कर्मचारी आणि पोलिसांना समजताच त्यांनी अवघ्या 4 तासांमध्ये 61 किलोमीटरच्या पाठलागानंतर या प्रकरणाचा छडा लावत 21 लाख 13 हजार 700 रुपयांची रोकडही परत आणली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या धाडसी चोरीने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
4 तासांमध्ये 61 किमीचा प्रवास करत परत आणली लाखोंची रक्कम
बीडच्या धारूर येथे घडलेले अजब चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावत हे प्रकरण उजेडात आणले. यात बीडच्या गेवराई परिसरातील जायकवाडी शिवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमधून अखेर हे एटीएम मशीन जप्त केल्या गेलं. विशेष म्हणजे या मशीनमधील 21 लाख 13 हजार 700 ची रोकड परत आणली गेली आहे. धारूरचे पोलिस निरीक्षक देविदास वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली असून फरार असणाऱ्या चार आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे या आरोपींचा तास सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
एका व्यक्तीचे 94 लाख रुपयांचे नुकसान
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका 48 वर्षीय व्यक्तीला शेअर ट्रेडिंग घोटाळ्याचा बळी पडून सुमारे 94 लाख रुपयांचे नुकसान झाले. कल्याण परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची 9 एप्रिल ते 21 मे दरम्यान फसवणूक झाली होती. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याला 'द व्हॅल्यू टीम ए13' नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप सापडला, ज्यामध्ये अनेक सदस्य स्वत:ला तज्ञ म्हणवत होते. ते लोक शेअर बाजारातून पैसे कमवण्याच्या टिप्स देत होते. दरम्यान, त्यांनी लोकांना ॲप्लिकेशन वापरून गुंतवणूक करण्यास प्रेरित केले.
त्याने सुचवलेल्या अर्जाद्वारे पीडितेने एकूण 93.6 लाख रुपयांची गुंतवणूक केली, परंतु त्या बदल्यात त्याला एकही पैसा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस पुरावे गोळा करून आरोपींचा शोध घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या