एक्स्प्लोर

Badlapur School: बदलापूरच्या नामांकित शाळेत चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण, पालकांना 12 तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी

Badlapur school: बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. यावरुन बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. शाळेच्या गेटवर मोर्चा.

बदलापूर: कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरचा अमानुष छळ करुन तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती.  या दोन्ही मुली अवघ्या साडेतीन ते चार वर्षांच्या आहेत. त्यामुळे या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संख्येने पालक, राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरु केले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते.

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हादरला होता. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे.

बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला होता. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यावरून पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आज बदलापूर बंदची हाक दिली आहे आंदोलन सुरु असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शाळेचा माफीनामा

या सगळ्या प्रकारानंतर शाळेकडून एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. या प्रकारानंतर सबंधित आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना सहकार्य केले. या घटनेनंतर सबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे, असे शाळेने निवेदनात म्हटले आहे.

पूर्व प्राथमिक आणि शिशु वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या आणि सांभाळ करण्याच्या दृष्टीने फक्त महिलांचीच नेमणूक केली जाणार आहे. या प्रकरणात पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेने त्यांची जाहीर माफी मागितली असून त्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व पालक, विद्यार्थी आणि शहरातील सजग नागरिकांना संस्थेने शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी संस्था तयार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी सांगितले आहे.

शाळेच्या गेटवर पालकांची मोठी गर्दी

हे प्रकरण इतकं संवेदनशील असतानाही बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तासांचा अवधी घेतला . शिवाय शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पालकांनी मंगळवारी सकाळी आक्रमक होत शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेटवर मोठी गर्दी केली आहे. शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी पालकांची मागणी आहे. त्याचबरोबर आज नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे ,या बदलापूर बंदमध्ये रिक्षा चालक, व्यापारी संघटना,शाळा बस चालक  देखील सहभागी झालेत. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 09 November 2024Shahu Maharaj on Raju Latkar: सूनेची उमेदवारी मागे का घेतली? राड्यावर शाहू महाराज काय म्हणाले?Sharad pawar On Balasaheb Thorat : धर्माधर्मात, जातीजातीत तेढ निर्माण करु नका : शरद पवारPrithviraj Patil On  Sudhir Gadgiil : जयश्रीताई तुमसे बैर नही, सुधीर गाडगीळ तुम्हारी खैर नही, पृथ्वीराज पाटील यांचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Vaibhav Naik : नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
Pyre: उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Embed widget