एक्स्प्लोर

Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम

Crime news: अक्षय शिंदे हा लहानपणापासून डोक्याने कमजोर होता, असे त्याच्या आईने सांगितले. त्याची गोळ्याऔषधे सुरु होती. त्याला छातीचं दुखणं होतं. रात्री साधारण साडेआठ वाजता आम्ही झाडलोट करुन शाळेतून बाहेर पडायचो

बदलापूर: बदलापूरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे राज्यभरात सध्या संतापाचा आगडोंब उसळला आहे. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. अशातच आता अक्षय शिंदे याच्या आईवडिलांच्या दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. 'एबीपी माझा'ने अक्षय शिंदे याच्या पालकांशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी अक्षयच्या आईवडिलांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत माहिती दिली. 

ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाले त्याच शाळेत अक्षय शिंदे याचे कुटुंब काम करत होते. त्यांच्याकडे शाळेच्या साफसफाईचे काम होते. आम्ही शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता शाळेत जायचो आणि सगळीकडे झाडू मारायचो. रात्री साधारण साडेआठ वाजता आम्ही झाडलोट करुन शाळेतून बाहेर पडायचो, अशी माहिती अक्षयच्या आईवडिलांनी दिली.

शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे होते का? 

या प्रकरणाचा तपास एसआयटी पथकाकडे देण्यात आला आहे. या तपासात शाळेतील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. याबाबत अक्षयच्या आईवडिलांना विचारण्यात आले. शाळेत आणि अक्षय काम करायचा त्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV) होता का, असा प्रश्न अक्षयच्या वडिलांना विचारण्यात आला. त्यावर वडिलांनी म्हटले की, हो शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे होते. अक्षय ज्या बाथरुमची साफसफाई करायचा तिकडेही सीसीटीव्ही होता, असे त्याच्या आईने सांगितले. अक्षय सकाळी 11 वाजता बाथरुम साफ करायचा. तो फक्त बाथरुम साफ करण्याचे काम करत होता, बाकी कोणतेही काम करत नव्हता, असेही अक्षयच्या आईने सांगितले.

शाळेत क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल

एसआयटी पथकाने बुधवारी बदलापूर पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाची सूत्रं हातात घेतली होती. यानंतर गुरुवारी सकाळी 
बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये भिवंडी क्राईम ब्रँच अधिकारी दाखल झाले आहेत. बदलापूरमधील आंदोलनाच्या दिवशी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती. त्याचप्रमाणे नेमकं घटना काय घडलेले आहेत याबाबत त्यांची चौकशी  सुरू आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर बॉक्स ताब्यात घेतला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात. त्यामुळे आता एसआयटी पुढे काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

VIDEO: अक्षय शिंदेच्या आईवडिलांचा खळबळजनक दावा

आणखी वाचा

अक्षय शिंदे गतीमंद होता का? आई म्हणाली, लहानपणापासून डोक्याने थोडा कमजोर; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Weather Alert: राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Weather Alert: राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Embed widget