एक्स्प्लोर

बदलापुरात इंटरनेट बंद, अनेक तास रेल्वे ठप्प; 4 वर्षांच्या मुलींसोबतच्या घृणास्पद, पाशवी कृत्याची A to Z कहाणी

बदलापूरमध्ये शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी रेल्वे ट्रॅकवर करण्यात आलेलं आंदोलन पोलिसांच्या कारवाईनंतर संपुष्टात आलं. सध्या बदलापूर बंद आहे. सर्व दुकानं बंद आहेत.

Badlapur School Crime Case : बदलापूर : दोन चिमुकल्यांना ओरबाडणाऱ्या नराधमाला फाशी द्या, या एका मागणीसाठी काल अख्खं बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. बदलापूरमध्ये शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणात ज्या मुलींवर अत्याचार झाला, त्या दोघीही चार वर्षांच्या. या वयात धड शब्दही नीट उच्चारता येत नाही. बोबडे बोल... धुडूधुडू धावणारी पावलं... पण नराधमानं त्याच्या वासनेपोटी अगदी कोवळ्या वयात त्यांच्या शरीरावर नाहीतर, मनावर घाला घातला. या नराधमाला फासावर लटकवा, या एकाच मागणी बदलापुरकरांची आहे. संतप्त बदलापूरकरांनी काल (मंगळवारी) शाळेबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर थेट रेल्वे स्टेशन गाठून रेल रोको केला. पोलिसांनी आवाहन केलं, नेतेमंडळींनी मनधरणी केली, तरी आंदोलक काही ऐकायचं नाव घेईनात, अखेर पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकासह काही अधिकची कुमक मागवून आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरुन हटवलं आणि आंदोलन मोडीत काढलं. कालच्या आंदोलनानंतर आजही बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. 

बदलापूरमध्ये शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी रेल्वे ट्रॅकवर करण्यात आलेलं आंदोलन पोलिसांच्या कारवाईनंतर संपुष्टात आलं. सध्या बदलापूर बंद आहे. सर्व दुकानं बंद आहेत. आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र येऊ नयेत, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, इंटरनेटही बंद ठेवण्यात आलं आहे.  याप्रकरणी काही लोकांना अटक केली असून आंदोलनला हिंसक वळण देणऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. येत्या 10 दिवसांत आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसेच, या प्रकरणी पोलीस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देशभरात स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोलकात्यापासून अगदी महाराष्ट्रापासून महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अवघा देश एकवटला आहे. एवढंच काय तर, सर्वोच्च न्यायालयानंही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे कोलकात्यातील डॉक्टरवर अत्याचार करुन तिला ठार करण्यात आलं, त्याप्रकरणी देशभरात निदर्शनं सुरू आहेत. तर दुसरीकडे, महाराष्ट्रातील बदलापुरात चिमुकल्यांना नराधमानं ओरबाडलं. मुलींना आई जगदंबेचं, माता दुर्गेचं रुप मानणाऱ्या देशातच त्या सुरक्षित नाहीत, ही आपल्या प्रत्येकासाठी लज्जास्पद ठरणारी बाब आहे. 

एकीकडे कोलकाता येथील लेडी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश संतप्त झाला. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातूनही हादरवणारी बातमी समोर आली. महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कोलकाता आणि बदलापूरचं आंदोलन एकाच मुद्द्यावर होतं, ते म्हणजे मुलींचं लैंगिक शोषण. 

बदलापुरात नेमकं काय झालंय? 

बदलापूरच्या एका शाळेत दोन चार वर्षांच्या मुलींसोबत अशी घृणास्पद घटना घडली की, हजारो लोकांच्या जमावानं रेल्वे स्टेशनला ओलीस ठेवलं. मात्र, पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर पोलिसांनी रेल्वे ट्रॅक रिकामा केला आणि 10 तासांनंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाली. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यासाठी त्यांना 12 तास पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आणि पोलिसांनी पीडित कुटुंबियांना गुन्हा केल्याप्रमाणे वागणूक दिल्याचा आरोप या लोकांनी केला आहे. याच्याच निषेधार्थ मंगळवारी हजारो लोक रस्त्यावर आले आणि या संतप्त लोकांनी महाराष्ट्रातील बदलापूर रेल्वे स्थानक ओलिस ठेवलं आणि परिस्थिती अशी बनली की, पोलिसांना हे रेल्वे स्टेशन बंद करावं लागलं. संपूर्ण लोकल वाहतूक थांबली. अनेक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. 

आरोपीला फाशी द्या, एकाच मागणीसाठी संपूर्ण बदलापूर रस्त्यावर 

आधी शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनानं काही वेळानं हिंसक रुप धारण केलं. बदलापूरमध्ये तणाव वाढल्यानंतर ज्यावेळी पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीमार केला. त्यावेळी आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केली. या सर्व प्रकारानंतर जेव्हा पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीमार केला, तेव्हा सर्वसामान्यांच्या या जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली आणि म्हटलं की, "भारतातील सरकारी यंत्रणेकडून न्याय मिळवणं आजही इतके अवघड का आहे? खरं तर, जेव्हा गुंड उघडपणे एखाद्या कुटुंबातील बहीण, मुलगी, पत्नी आणि आई यांच्याशी गैरवर्तन करतात आणि पोलीस हे सर्व घडताना मूकपणे पाहत असतात, कारवाई करण्यास नकार देतात, तेव्हा जनतेला कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय नसतो, दुसरा मार्ग नाही. रस्त्यावर उतरून आपलं उग्र रूप दाखवलं नाही तर त्यांना कधीच न्याय मिळणार नाही, हे जनतेला समजलं आणि एक सन्माननीय नागरिकाप्रमाणे ते आपल्या देशातील गुन्हेगार, यंत्रणा आणि पोलिसांचे अत्याचार शांतपणे सहन करत राहिले. त्यांच्या मुलांना कधीच न्याय मिळणार नाही. मुलींच्या छेडछाडीचे हे प्रकार थांबवण्यासाठी तेथील जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं, हे कोणत्याही देशाचं दुर्दैव आहे."

'त्या' दिवशी नेमकं घडलं काय? 

बदलापूरमधील नामांकीत शाळा. या शाळेत घडलेल्या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं. बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगारानं दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनानं माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांचं निलंबन करण्यात आलं आहे. बदलापुरात चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं. शेकडो पालक रस्त्यावर चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. यातील एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षांच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. ही घटना 12 ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली. बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला. या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला. दरम्यान, शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी शाळेनं महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही. 

12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत, असं चिमुकलीचं वाक्य होतं. तिला समजलंही नव्हतं की, तिच्यासोबत काय घडलंय... सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली, त्यावेळी प्रकार उघडकीस आला. शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणीनंतर ज्या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. 

तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालकांना 12 तास ताटकळत ठेवलं 

संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा प्रथम तपास केल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली.

शाळेकडूनही दुर्लक्ष 

पोलिसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसण्यासोबतच शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचंही काही पालकांनी सांगितलं. या घटनेमुळे बदलापूरमधील विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्या प्रकारे देखरेख करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

बदलापूर प्रकरणी SIT गठीत 

बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारनं SIT स्थापन केली असून ज्येष्ठ IPS अधिकारी आरती सिंह या त्याच्या प्रमुख असतील. या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारनं पोलिसांना दिले आहेत. 

सरकारी वकील म्हणून उज्जल निकम यांची नियुक्ती 

बदलापूरमध्ये शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी रेल्वे ट्रॅकवर करण्यात आलेलं आंदोलन पोलिसांच्या कारवाईनंतर संपुष्टात आले. सध्या बदलापूर बंद आहे. सर्व दुकानं बंद आहेत. आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून जमावबंदी लागू करण्यात आलीये. दरम्यान इंटरनेट सेवाही बंद आहे. याप्रकरणी काही लोकांना अटक केली असून आंदोलनला हिंसक वळण देणऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. येत्या 10 दिवसांत आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसंच या प्रकरणी पोलीस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget