एक्स्प्लोर

Badlapur School Case: बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेला 26ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, SIT प्रमुख आरती सिंह बदलापूरमध्ये दाखल

Crime news: एसआयटी पथकाच्या प्रमुख आरती सिंह आजपासून तपासाला सुरुवात करणार आहेत. आरोपी अक्षय शिंदे याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कसून चौकशी होणार. आरती सिंह तपासाचा चार्ज घेणार, पथकं तयार करणार

कल्याण: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याची परिणती उग्र आंदोलनात झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी आरोपी अक्षय शिंदे याला  कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. अक्षय शिंदे याच्याविरोधात सध्या प्रचंड जनक्षोभ आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला थेट कोर्टात न आणता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, न्यायालय परिसरात प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करुन अक्षय शिंदे याला आज कोर्टासमोर हजर करण्यात आले.  आज त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सरकारी वकिलांनी हे प्रकरण गंभीर असून, याप्रकरणाची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने अक्षय शिंदे याची रवानगी 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

तर दुसऱ्या बाजूला याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख आरती सिंह बुधवारी बदलापूरमध्ये दाखल झाल्या. बदलापूरमधील (Badlapur School case) ज्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तिथे जाऊन आरती सिंग या तपासाची सूत्रे हाती घेणार आहेत. यानिमित्ताने ठाण्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलापूरमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डीआयजी आरती सिंग या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. एसआयटी पथकात कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश होणार, कोण तांत्रिक पुरावे गोळा करणार, कोण घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करणार, तपासाची दिशा नेमकी कशी असेल, याबाबतचे निर्णय या बैठकीत होतील. त्यानंतर आरती सिंह अधिकृतरित्या बदलापूर पोलिसांकडून तपासाची सूत्रे स्वीकारतील. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बदलापूरमध्ये तणाव कायम

बदलापूर पूर्वेला असणाऱ्या शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर अक्षय शिंदे याने शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन अत्याचार केले होते. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात चालढकल झाल्याने बदलापूर शहर आणि रेल्वे स्थानकात मंगळवारी उग्र आंदोलन झाले होते. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बदलापूरमध्ये तणाव कायम आहे. शहरातील मोजकी दुकाने उघडली आहेत. तर शाळा या बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बदलापूर शहरातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. याशिवाय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे.

आणखी वाचा

बदलापूरमध्ये शाळा, इंटरनेट बंद; CCTV फुटेज बघून पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरु, दीपक केसरकरांचं महत्त्वाचं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
Ladki bahin yojana: लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या पैशातून व्यवसाय, 10 दिवसात 10 हजार कमावले100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 सप्टेंबर 2024ABP Majha Headlines : 03.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 13 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Metro : देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, अहमदाबाद-भुजला जोडणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातमध्ये धावणार, 30 रुपयांपासून तिकीट सुरु, जाणून घ्या वेळापत्रक
Dharavi Redevelopment: धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा छुप्या पद्धतीने उरकण्याची वेळ
Ladki bahin yojana: लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
लाडक्या बहिणीनं डोकं लावलं, योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; 10 दिवसांत किती कमावले?
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
मराठवाड्यात 25 आमदार पाडणार, यादी तयार; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा, CM शिंदेंही लक्ष्य
Ajit Pawar: अजित पवारांचे परतीचे सर्व दोर कापले, शरद पवार गटातील नेत्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
अजित पवारांचे परतीचे सर्व दोर कापले, शरद पवार गटातील नेत्याचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
सिन्नरला मतदार यादीचा वाद पेटला, आमदार माणिकराव कोकाटेंवर उदय सांगळेंचा गंभीर आरोप
MP Vishal Patil : सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे? पाच दिवसांत दुसऱ्यांदा भूवया उंचावल्या!
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
परदेशात जाऊन देशाची प्रतिष्ठा घालवणारी व्यक्ती कधीच भारताचे नेतृत्त्व करु शकत नाही, पंकजा मुंडे राहुल गांधींवर संतापल्या
Embed widget