एक्स्प्लोर

बदलापूरमध्ये शाळा, इंटरनेट बंद; CCTV फुटेज बघून पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरु, दीपक केसरकरांचं महत्त्वाचं वक्तव्य

Badlapur School Crime News: बदलापूरमधील या घटनेवर राज्य सरकारच्यावतीने मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. 

Badlapur School Crime News: बदलापूर शहरातील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर आता बदलापूरसह राज्यातील जनतेतून संतापाची लाट पसरली आहे. नराधमाला फाशी द्या अशी मागणी करत सकाळी साडे सहा पासून आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं. आंदोलकांनी यासाठी बदलापूर रेल्वे ट्रॅक अडवून ठेवला होता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होतं. पोलीस प्रशासन, राज्य सरकारकडून आंदोलकांना अनेकवेळा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक काही ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज करत पोलिसांनी त्यांना रेल्वे ट्रॅकवरुन हटवले.

बदलापूर आंदोलन प्रकरणी (Badlapur School Crime News) 300 ते 400 आंदोलनकर्त्यांवर कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  28 जणांना पोलिसांनी अटक केली आहे अजूनही धरपकड सुरूच आहे. कायदेशीर पणाने रेल्वे अडवणे सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण करणे पोलिसांवर दगडफेक करणे, हिंसक आंदोलन करणे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विविध कलमानुसार कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचे सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. बदलापूरमधील या घटनेवर राज्य सरकारच्यावतीने मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. 

दिपक केसरकर म्हणाले की, मी बदलापूरला जाऊन आलो आहे. विद्यालयाचे ट्रस्टी, मुख्यध्यापक, तसेच ज्या संस्थेने वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या या सर्वांना भेटून आलो आहे. सदर घटना 12 तारखेला घडली होती माञ शाळेने ही घटना दाबली होती. संबंधित संस्था चालकांनी अपली बदनामी होईल म्हणून प्रकरणं दाबून ठेवलं आहे. संबंधित पोलीस स्थानकात असणाऱ्या पीआय यांनी देखील कारवाईमध्ये दिरंगाई केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल. मी सर्व अहवाल मागवला आहे. जी कारवाई करायची आहे ती तत्काळ केली जाईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. अहवाल आल्यानंतर सबंधित संस्थेत प्रशासक नेमण्याबाबत निर्णय होईल. तसे अधीकार आम्हाला आहेत, असं दीपक केसरकरांनी सांगितले. 10 ते 15 टक्के पालक आंदोलनात होते. मात्र बाकी लोक आंदोलक नव्हते. कारण गिरीश महाजन त्यांच्यासोबत बोलायला गेले होते, तेव्हा त्यांच्यावर बाटल्या फेकण्यात आल्या, असा दावाही दीपक केसरकरांनी केला. 

ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब...-दीपक केसरकर

ज्या डॉक्टरांनी संबंधित मुलीवर उपचार करायला नकार दिला, त्यांच्यावर देखील कारवाई होईल. या मुलीवर उपचार झाले नाहीत. कोणतेही उपचार न होता ही मुलगी पोलीस ठाण्यात बाकडावर पडून राहते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. या प्रकरणी पीआय यांना निलंबित करावं, यासाठी मी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे आणि निलंबन करण्याची विनंती करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सक्त आदेश दिले आहेत की, मुलांच्याबाबत कोणी चुकीच्यापद्धतीने वागत असेल तर त्यावर सक्त कारवाई केली जाईल. 21 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता मी पालकांची बैठक त्या शाळेत बोलावली आहे. या बैठकीला पालकांनी उपस्थित राहावं. त्यांचं म्हणणं काय आहे ते मोकळेपणाने माझ्याशी बोलावं, असं आवाहन देखील दीपक केसरकर यांनी केलं आहे. 

पुण्यातही असाच प्रकार-

पुण्याच्या एका खाजगी शाळेत देखील असाच काहीसा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी तो प्रकार यशस्वी झाला नाही. मात्र त्या शाळेने देखील हा प्रकार लपवून ठेवला त्यामुळे त्या शाळेवर देखिल प्रशासक नेमण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. ज्यावेळी आम्ही प्रशासक नेमतो, त्यावेळी आम्हाला प्रक्रिया पार पडावी लागते. अन्यथा संबंधित लोक कोर्टात जातात आणि स्टे मिळतो म्हणून संस्था चालकांना बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले.

संबंधित व्हिडीओ-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime: पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
Mumbai Metro : आनंदवार्ता! बहुप्रतीक्षित मंडाळे ते चेंबूरदरम्यानची मेट्रोसेवा याच महिन्यात सुरु होण्याची शक्यता; CMRS पथकामार्फत आजपासून तपासणी
आनंदवार्ता! बहुप्रतीक्षित मंडाळे ते चेंबूरदरम्यानची मेट्रो याच महिन्यात धावण्याची शक्यता; CMRS पथकामार्फत आजपासून तपासणी
Gondia Crime News : मजुरीचे पैसे मागितले म्हणून ठेकेदारानेच केली मजुराची निर्घृणपणे हत्या; दोन आरोपींना अटक, गोंदिया हादरलं!
मजुरीचे पैसे मागितले म्हणून ठेकेदारानेच केली मजुराची निर्घृणपणे हत्या; दोन आरोपींना अटक, गोंदिया हादरलं!
Apple Event मध्ये AirPods Pro 3 लाँच, मनोरंजनासह हॉर्ट रेट ट्रॅकिंग फीचरची सोय, किंमत किती? 
Apple Event मध्ये AirPods Pro 3 लाँच, मनोरंजनासह हॉर्ट रेट ट्रॅकिंग फीचरची सोय, किंमत किती? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime: पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं
Mumbai Metro : आनंदवार्ता! बहुप्रतीक्षित मंडाळे ते चेंबूरदरम्यानची मेट्रोसेवा याच महिन्यात सुरु होण्याची शक्यता; CMRS पथकामार्फत आजपासून तपासणी
आनंदवार्ता! बहुप्रतीक्षित मंडाळे ते चेंबूरदरम्यानची मेट्रो याच महिन्यात धावण्याची शक्यता; CMRS पथकामार्फत आजपासून तपासणी
Gondia Crime News : मजुरीचे पैसे मागितले म्हणून ठेकेदारानेच केली मजुराची निर्घृणपणे हत्या; दोन आरोपींना अटक, गोंदिया हादरलं!
मजुरीचे पैसे मागितले म्हणून ठेकेदारानेच केली मजुराची निर्घृणपणे हत्या; दोन आरोपींना अटक, गोंदिया हादरलं!
Apple Event मध्ये AirPods Pro 3 लाँच, मनोरंजनासह हॉर्ट रेट ट्रॅकिंग फीचरची सोय, किंमत किती? 
Apple Event मध्ये AirPods Pro 3 लाँच, मनोरंजनासह हॉर्ट रेट ट्रॅकिंग फीचरची सोय, किंमत किती? 
शेतकऱ्यांनो पिकांना हवं तितकं पाणी द्या, वीज बिलाची चिंता मिटली; उपसा योजनांच्या वीज सवलतीस 2 वर्षे मुदतवाढ
शेतकऱ्यांनो पिकांना हवं तितकं पाणी द्या, वीज बिलाची चिंता मिटली; उपसा योजनांच्या वीज सवलतीस 2 वर्षे मुदतवाढ
Nashik Crime News: पोट साफ होत नाही म्हणून केली सोनोग्राफी; अल्पवयीन मुलगी गर्भवती, बापानेच शरीराचे लचके तोडले, नाशिकमधील धक्कादायक घटना
पोट साफ होत नाही म्हणून केली सोनोग्राफी; अल्पवयीन मुलगी गर्भवती, बापानेच शरीराचे लचके तोडले, नाशिकमधील धक्कादायक घटना
Asia Cup : एस. अटल , ओमरझाईची अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानची विजयी सलामी, हाँगकाँगवर दणदणीत विजय
राशिद खानच्या अफगाणिस्तानची विजयी सलामी, आशिया कपमध्ये हाँगकाँगवर दणदणीत विजय
Pune Crime Bandu Andekar: आधी थाटात जमिनीवर मांडी घालून बसला, पोलिसांनी खुणावताच बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला, नेमकं काय घडलं?
आधी थाटात जमिनीवर मांडी घालून बसला, पोलिसांनी खुणावताच बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला, नेमकं काय घडलं?
Embed widget