एक्स्प्लोर

Ashok Kharat Crime News: अशोक खरात प्रकरणात 'डॉक्टर' कनेक्शन! महिलांच्या गर्भपातासाठी बड्या डॉक्टरांनी पुरवल्या गोळ्या? SIT तपासात खळबळजनक माहिती

Ashok Kharat Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पापाचा घडा आता अधिकच भरत चालला आहे. एसआयटी (SIT) तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, खरातने पीडित महिलांचे शोषण केल्यानंतर त्यांचे गर्भपात करण्यासाठी नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरांची मदत घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये महापालिकेच्या एका डॉक्टराचाही समावेश असल्याचे समजते, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

स्वतःला "दैवी शक्ती" असलेला पुरुष सांगून अशोक खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. घरगुती आणि वैयक्तिक समस्या दूर करण्याच्या बहाण्याने त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. या तपासादरम्यान एका पीडित महिलेच्या गर्भपाताचे प्रकरण समोर आले होते. गर्भपात नेमका कुठे आणि कोणाच्या मदतीने करण्यात आला, याचा तपास करताना पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले आहेत.

Ashok Kharat Crime News: डॉक्टरांकडून 'गोळ्यां'चा पुरवठा?

तपासात असे समोर आले आहे की, खरातच्या संपर्कात नाशिकमधील काही बडे डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर्स चालक होते. जेव्हा एखादी पीडित महिला गरोदर राहायची, तेव्हा खरात तिला गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा. नियमबाह्य पद्धतीने या गोळ्या खरातपर्यंत कशा पोहोचल्या? याचा शोध घेतला असता, काही डॉक्टरांनी त्याला या गोळ्या पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Ashok Kharat Crime News: खरात प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता

नाशिक महानगरपालिकेतील एक डॉक्टर खरातच्या नियमित संपर्कात होता आणि त्याने या गैरकृत्यात मदत केल्याचा संशय आहे. काही खासगी सोनोग्राफी सेंटर्समध्ये पीडित महिलांची तपासणी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? याचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता अशोक खरात प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Kalpana Kharat: खरातच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, नाशिकमधील महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात यांच्या पत्नीविरुद्धही शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका शेतकऱ्याच्या जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा नोंद असून ती सध्या फरार आहे. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी तिच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. राहाता येथील न्यायालयात बुधवारी या प्रकरणी सुमारे सव्वातास युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News: माझ्या अंगात दैवी शक्ती, माझं कोणी वाकडं करू शकणार नाही, रुद्राक्षाची भीती दाखवून भोंदूबाबाने महिलेसोबत नको ते केलं; अशोक खरातनंतर 'महेशगिरी'चं भयानक कांड

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget