एक्स्प्लोर

Sana Khan Update : सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक, मृतदेहाची विल्लेवाट लावणाऱ्या महेंद्र यादवला बेड्या; मृतदेहाचा शोध सुरूच

BJP Sana Khan Murder Case : सना खान हत्याकांड प्रकरणात मृतदेहाची विल्लेवाट लावणाऱ्या महेंद्र यादवला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मृतदेहाचा शोध अद्याप सुरुच आहे.

नागपूर : भाजप कार्यकर्त्या सना खान हत्याकांड (Sana Khan Murder Case) प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सना खान यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या महेंद्र यादवला पोलिसांनी अटक केली आहे. सना खान यांचा मृतदेह अजून सापडलेला नाही. अमित साहूला भेटायला त्या 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. त्यानंतर 2 ऑगस्टला त्यांच्यात भांडण झालं. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. मात्र, महेंद्र यादवला अटक केल्यामुळे बरीच माहिती उघड होण्याची शक्यता आहे. एक मृतदेह सापडला असून तो सनाचा नसल्याचा तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे. त्याची डीएनए चाचणी होणार आहे.

'त्या' मृतदेहाची डीएनए चाचणी होणार

भाजप नेत्या सना खान (Sana Khan) यांच्या मृतदेहाचा शोध अद्यापही सुरु आहे. मध्य प्रदेशातील एका महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला होता, हा मृतदेह सना खान यांचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली परिसरात विहिरीत सापडलेला मृतदेह हा सना खान यांचा नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे सना खान प्रकरणातीस गूढ अजून वाढलं आहे. हरदा जिल्ह्यातील शिराली परिसरात विहिरीत सापडलेला मृतदेह हा सना खान यांच्याशी मिळताजुळता असल्याचं वाटत असल्यामुळे नागपूर पोलिसांनी याप्रकरणी डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील अहवाल समोर आल्यावर पुढील माहिती समोर येईल.

विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला होता. ही विहीर जबलपूरपासून तीनशे किलोमीटर अंतरावर आहे. हा मृतदेह नागपूर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेहावरील कपडे सना खान यांनी अखेरच्या दिवशी घातलेल्या कपड्यांसारखे दिसत असल्यामुळे तशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र संबंधित मृतदेह सना खान यांचेच आहे हे अजून स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यामुळे नागपूर पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांच्यासोबत सना खान यांचे कुटुंबीय देखील होते. मात्र संबंधित मृतदेह हा सना खान यांचा वाटत नसल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे.

मुख्य आरोपी अमित साहूला अटक

सना खान प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहूला याआधी अटक करण्यात आली होती. सना खान प्रकरण नागपूर पोलिसांनी आधीच संशयित आरोपी अमित साहूच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
माझा मुलगा राज्यस्तरीय खेळाडू, धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, साताऱ्यात नातेवाईकांची मागणी
माझा मुलगा राज्यस्तरीय खेळाडू, धिंड काढणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, साताऱ्यात नातेवाईकांची मागणी

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget