एक्स्प्लोर

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार; 3 शहरांमधील स्मशानभूमीमध्ये चाचपणी सुरू

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर आज किंवा उद्या सकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Akshay Shinde Encounter: पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेला बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा मृतदेह दफन करून त्याचा अंत्यविधी व्हावा यासाठी प्रशासनाकडून योग्य ती जागाच उपलब्ध केली जात नसल्याने अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांना शुक्रवारी तातडीने उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्यसरकारने गुरूवारी उच्च न्यायालयात हमी दिली होती. यानंतर आता महत्वाची माहिती समोर आली आहे. 

अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी ठाणे पोलिसांनी बदलापूर, अंबरनाथ आणि ठाण्यातील स्मशानभूमींमध्ये चाचपणी सुरू केली आहे.  पोलीस प्रशासनाकडून  स्मशानभूमित जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जागा उपलब्ध होताच आज किंवा उद्या सकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अंत्यसंस्काराला केवळ जवळच्या नातेवाईकांनीच उपस्थित राहावे-

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने हाताळावा, असे न्यायालयाने म्हटले. अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला केवळ जवळच्या नातेवाईकांनाच उपस्थित राहण्यास सांगण्यात यावे, अशी विनंती वेणेगावकर यांनी केली. वडिलांच्या वकिलांना कोर्टाने तसे निर्देश दिले. तसेच त्याच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन आणि निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत शांततेत दफनविधी होईल याची खबरदारी घ्या, अशी सूचना देखील सरकारला केली. 

मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी कायदा-

दफनभूमी ही शासनाची आहे कोणाच्याही मालकीची नाही. त्यामुळे मृतदेह दफन करण्यासाठी अंबरनाथ येथे जागा देण्यास का नकार दिला, याबाबतीत अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांचे वकील कटारनवरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारी जमीन ही कुठल्याही जातीधर्माची नसून त्या जागेवर अंत्यविधी नाकारणारे लिंगायत समाज आणि गोसावी समाज यांचा दफनभूमीवर मालकी हक्क आहे का, असा सवाल अण्णा शिंदे यांच्या वकिलांनी उपस्थित केला. अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत आहे. मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी कायदा आहे. त्या कायद्यानुसार उच्च न्यायालयामध्ये मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही धाव घेणार आहोत. त्यानंतरच मृतदेहाची विल्हेवाट कशी करायची, याबाबतीत कोर्टाकडूनच आम्ही परवानगी घेणार असल्याची माहिती याचिकाकर्ते वकील अमित कटारनवरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

अमित कटारनवरे गुन्हा घडलेल्या ठिकाणांची पाहाणी करणार-

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी याचिकार्त्यांचे वकील अमित कटारनवरे गुन्हा घडलेल्या ठिकाणांची पाहाणी करणार आहेत. पोलिसांकडून तळोजा कारागृहातून अक्षय शिंदेला संध्याकाळी 5.30 वाजता बाहेर काढलं होतं, आणि मुंब्रा बायपास जिथे घटना घडली तिथे संध्याकाळी 6.15 पर्यंत पोहोचले होते. अशात, खरंच तितका वेळ लागला का? सोबतच मुंब्रा बायपास ते कळवा रुग्णालय किती वेळ लागला? यासंदर्भात क्राइम सीन रिक्रिएशन करत नेमकं तथ्य काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. संध्याकाळी 5.30 वाजता तळोजा जेल परिसराजवळ ॲड. कटारनवरे सुरुवात करतील, अशी माहिती मिळत आहे.

संबंधित बातमी:

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?

पिस्तुल हिसकावल्याच्या थिअरीवर विश्वास ठेवणं कठीण जातंय; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
×
Embed widget