एक्स्प्लोर

पिस्तुल हिसकावल्याच्या थिअरीवर विश्वास ठेवणं कठीण जातंय; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती

Akshay Shinde Encounter: न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेने पिस्तुल हिसकवल्याच्या आरोपावर विश्वास ठेवणं कठीण जात असल्याचं म्हटलं आहे. न्यायालयात नेमकं काय घडलं?,जाणून घ्या...

Akshay Shinde Encounter: बदलापूर खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) .याचा सोमवारी (23 सप्टेंबर) रोजी अचानक पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने फौजदारी रिट याचिका दाखल केली. आज या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेने पिस्तुल हिसकवल्याच्या आरोपावर विश्वास ठेवणं कठीण जात असल्याचं म्हटलं आहे. न्यायालयात नेमकं काय घडलं?,जाणून घ्या...

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा युक्तिवाद जसाच्या तसा-

माझ्या मुलाची(अक्षय शिंदेची (Akshay Shinde) पिस्तूल हिसकावण्याची हिंम्मत नाही. मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. भविष्यात निवडणुक असल्याने मुलावर रोष असल्याने त्याचा राजकाय फायदा घेतला जात आहे, असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांच्याकडून वकील अमित कटारनवरे हे ठाणे  पोलिसांनी दिलेली प्रेस नोट वाचून कोर्टासमोर माहिती दिली. अशा प्रकारच्या घटना या कायद्याला अनुसरून नाहीत. भविष्यात पोलीसराज सुरू होण्यास वेळ लागणार नाही. 'देवा भाऊचा न्याय', 'मुख्यमंत्र्यांचा न्याय' असे संदेश जाऊ लागले तर मग न्यायव्यवस्थेची गरज काय?, हे प्रकार लोकशाहीला मारक आहे.  त्यामुळे या प्रकरणात तातडीनं न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला.

न्यायालयाने कोणते प्रश्न उपस्थित केले-

बंदूक कोणती होती?

9 MM पिस्तुल होती - सरकारी वकिल

पिस्तुल होतं की रिवॉलव्हर?, नवं होतं की जुनं?- हायकोर्ट

अनुनभवी व्यक्तीसाठी प्रिस्टल चालवणं सोप नाही -हायकोर्ट

पोलीस अधिकारी युनिफॉर्ममध्ये होते का?, नेमकं काय घडलं?- हायकोर्टाचे सवाल

रिव्हॉल्वहर चालवणं सामान्य माणसासाठी एकवेळ शक्य आहे?, पण पिस्तुल चालवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असतं-हायकोर्ट

सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही?-हायकोर्ट

"तुम्ही कधी ते चालवलंय का?", न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारी वकिलांना सवाल

"मी अंदाजे 500 राऊंड फायर केलेत" - न्या. चव्हाण

त्यामुळे काही गोष्टी न पटण्यासारख्या आहे - हायकोर्ट

राज्य सरकारच्यावतीनं हितेन वेणेगावकर यांनी काय बाजू मांडली?

या प्रकरणाचा तपास स्टेट सीआयडीकडे दिलेला आहे, त्यांची स्वतंत्र चौकशी सुरू झालीय.

सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या - हायकोर्ट

आरोपीच्या पत्नीनं बोईसर इथं दिलेल्या तक्रारीनुसार तिथं गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्यात आलं.

कोर्टाच्या परवानगीनं याप्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कस्टडी ठाणे क्राईम ब्रांचला दिली होती. त्यासाठीच त्याला नेलं जात होतं, त्यादरम्यान आरोपी शांत बसला होता.

तो अचानक आक्रमक होईल अशी काही लक्षणं नव्हती, अशी माहिती सरकारने दिली. या घटनेनंतर आरोपीसह जखमी पोलीसांना तातडीनं रूग्णालयात नेलं.

कळवा येथील शिवाजी रूग्णालय 20 मिनिटांच्या अंतरावर होतं.

23 सप्टेंबरच्या संध्याकाळी 7:52 वाजता डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केलं.

24 सप्टेंबरच्या 4:56 या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

त्यानंतर 8 वाजता बॉडी जेजेत पोस्टमार्टमसाठी पाठवली.

त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे.

जखमी पोलीसाच्या मांडीतून गोळी आरपार गेली आहे. आरोपीनं अचानक अधिका-याच्या कमरेत खोचलेलं पिस्तुल खेचलं आणि तीन राऊंड फायर केले. त्या गाडीत चार पोलीस अधिकारी होते, जे पूर्णपणे प्रशिक्षित होते. त्यातला एक एन्काऊंटकर केलेला पारंगत अधिकारी होता.

सरकारच्या युक्तीवादावर कोर्टाने काय निर्देश दिले?

यासर्वांवर आरोपी वरचढ ठरून पिस्तुल हिसकावू शकतो?, हे समजणं थोडं कठीण जातंय - हायकोर्ट

आमच्या पोलीसांच्या कारवाईवर संशय नाही, पण सत्य समोर येणं गरजेचं- हायकोर्ट

अक्षय शिंदेवर चालवलेल्या गोळीचा फॉरेंसिक रिपोर्ट सादर करा-हायकोर्ट

गोळी कुठून आणि किती दूरून चालवली गेली?- हायकोर्ट

ती आरोपीला कुठे लागली आणि कुठून बाहेर पडली?- हायकोर्ट

याचा अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश- हायकोर्ट

संबंधित बातमी:

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaAmit Shah Maharashtra Vidhan Sabha : विधानसभेसाठी अमित शाहांचं 'मिशन महाराष्ट्र' जागावाटपाबाबत लवकरच दिल्लीत बैठकABP Majha Headlines : 07 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHC on Mumbai Police : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Latur : आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
Embed widget