धक्कादायक! गुंगीचं औषध देऊन दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार, अकोल्यातील घटनेने खळबळ
Akola crime news : अकोला शहरात दोन अल्पवयीन मुलींवर काल रात्री सामुहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Akola crime news : राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अकोला शहरात दोन अल्पवयीन मुलींवर काल रात्री सामुहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींना शितपेयांतून दारू आणि गुंगीचे औषध देवून सामूहिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. अकोला शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यातील एक मुलगी 15 आणि एक 17 वर्षे वयाची आहे. दरम्यान, या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात सहा ते सात आरोपी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Akola crime news : काल रात्री नेमकं काय झालं?
16 डिसेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक ओळखी युवक भेटला. लीप्ट देण्याच्या बहाण्याने या युकाने त्यांना सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या 'पवन वाटिके'त घेऊन गेला. त्यानंतर तेथे त्याने या दोघींना चॉकलेट आणि शितपेय प्यायला दिले. शितपेय प्यायल्यानंतर त्यांना गूंगी यायला लागली. यानंतर त्या दोघींवरही त्याने अत्याचार केले. यानंतर त्याचा मित्रही तिथे आला आणि त्यानेही दोघींवर अत्याचार केले. या संपूर्ण प्रकरणात चार ते सहा जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आलीय.
Akola crime news : असा झाला प्रकरणाचा उलगडा
काल रात्री या दोन्ही अल्पवयीन मुलींना घरी पोहचायला उशीर झाला. त्या दोघीही रात्री एक वाजता घरी पोहोचल्या होत्या. घरच्यांनी या दोन्ही मुलींना उशीर झाल्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मुलींनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. दोन्ही मुलींच्या नातेवाईकांनी आज सकाळी सिव्हिल लाईन पोलिस ठाणे गाठले. मुलींवर झालेल्या अत्याचारबद्दल तक्रार दिली. सध्या या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांकडून चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Akola crime news : पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
अत्याचाराबाबत सध्या पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. ऋषिकेश, करण आणि रोहित अशी तिघा संशयितांची नावे आहेत. यातील ऋषिकेश याने या दोन्ही मुलींना आपल्या दुचाकीवर बसवून पवन वाटिकेत घेवून गेला होता. त्यानंतर त्याने दोन्ही मुलींवर अत्याचार केले.
Akola crime news : शितपेयातून दिली दारू
दरम्यान पीडित दोन्ही अल्पवयीन मुलींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री कोल्ड्रिंक्स पीत असताना त्यामध्ये कडूपणा जाणवला. त्यामुळे त्यात दारू असावी असा संशय दोन्ही मुलींनी व्यक्त केला आहे. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर चक्कर आल्यासारखं दोन्ही मुलींना वाटलं. त्यानंतर त्याना गूंगी आली. त्यानंतर दोन तरुणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी त्यांचे अन्य मित्रही येथे उपस्थित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अत्याचार करणाऱ्या तरुणांनी दोन्ही मुलींना कोल्ड्रिंगमध्ये दारू दिली की दुसरं काही दिलं? याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या