Zee चे शेअर्स 25 टक्क्यांनी वधारले! राकेश झुनझुनवाला यांना एकाच आठवड्यात 50 कोटींचा नफा
Sony Pictures सोबतच्या मेगा मर्जनंतर झी एन्टरटेनमेन्टच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला ( Rakesh Jhunjhunwala) यांनी एका आठवड्यापूर्वीच झीमध्ये 0.5 टक्के शेअर्स खरेदी केले होते.
मुंबई : झी एन्टरटेनमेन्ट (Zee Entertainment) आणि सोनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडने (Sony Pictures Networks India Private Limited) विलीनीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर झी एन्टरटेनमेन्टचे शेअर्स चांगलेच वधारले आहेत. याचा मोठा आर्थिक फायदा शेअर मार्केटमध्ये 'बिग बुल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना झाला आहे. झी एन्टरटेनमेन्टच्या वधारलेल्या शेअर्समुळे राकेश झुनझुनवाला यांना एकाच आठवड्यात 50 कोटींचा नफा झाला आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्या रेअर एंटरप्राईजेसने झी एन्टरटेनमेन्टचे 0.5 टक्के म्हणजे 50 लाख शेअर्स खरेदी केले होते. त्यावेळी झीच्या एका शेअर्सची किंमत ही 220.4 रुपये इतकी होती. पहिल्याच दिवशी राकेश झुनझुनवाला यांना तब्बल 20 कोटी रुपयांचा नफा झाला होता. आता एक आठवड्यानंतर राकेश झुनझुनवाला यांनी 50 कोटी रुपये कमावले आहेत. आधीच्या तुलनेत झी एन्टरटेनमेन्टच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.
झी एन्टरटेनमेन्ट (Zee Entertainment) बोर्डने सोनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड (Sony Pictures Networks India Private Limited) सोबत विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या दोन कंपन्यांमध्ये झालेली ही मेगा डील तब्बल 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजे 11,615 कोटी रुपयांची असून यामध्ये सोनी पिक्चर्सकडे मेजॉरिटी शेअर्स (52.93 टक्के) असणार आहेत. या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतर पुनित गोयंका हे पुढील पाच वर्षांसाठी एमडी आणि सीईओ असतील.
या मेगा विलीनीकरणानंतर सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे मेजॉरिटी म्हणजे 52.93 टक्के शेअर्स तर झी एन्टरटेनमेन्टकडे 47.07 टक्के शेअर्स असणार आहेत. सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे या विलीनीकरण झालेल्या कंपनीचे मेजॉरिटी डायरेक्टर्स नियुक्त करण्याचे अधिकार असतील.
महत्वाच्या बातम्या :