एक्स्प्लोर

Changes from 1st June: एक जूनपासून होणार 5 मोठे बदल; तुमच्या खिशावरही होणार परिणाम

Changes from 1st June: एक जूनपासून काही आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा परिणाम तुमच्या खिशावरदेखील होणार आहे.

Changes from 1st June:  एक जून पासून काही नियम बदलणार आहेत. हे नियम बँकिंग आणि इतर आर्थिक गोष्टींशी निगडीत असल्याने त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. जाणून घ्या जून महिन्यात तुमच्या खिशावर कोणता परिणाम होणार आहे. st

थर्ड पार्टी विमा महाग 

एक जून 2022 पासून थर्ड पार्टी विमा होणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागणार आहे. हा नवा नियम चार चाकीच नव्हे तर दुचाकींनाही लागू होणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी थर्ड पार्टी मोटर व्हेइकल इन्शुरन्सच्या प्रीमियम दरवाढीला मंजुरी दिली आहे. 

इंजिनच्या क्षमतेनुसार असणार प्रीमियम

मोटार विम्याच्या प्रीमियममध्ये यापूर्वी 2019-20 या वर्षासाठी वाढ करण्यात आली होती. नव्या नियमानुसार आता 1000 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वाहनांना थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी 2,094 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. याआधी हा प्रीमियम 2019-20 मध्ये 2072 रुपये इतका होता.

तर, 1000 सीसी ते 1500 सीसी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 3221 रुपयांवरून 3416 रुपये करण्यात आला आहे. 1500 सीसी पेक्षा जास्त वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये 7890 रुपयांवरून 7897 रुपयांपर्यंत किरकोळ वाढ करण्यात आली आहे.

सरकारने दुचाकींच्या थर्ड पार्टी विमा प्रीमियमच्या दरातही बदल केला आहे. अधिसूचनेनुसार, 1 जून 2022 पासून, 150 cc ते 350 cc पर्यंतच्या बाईकसाठी 1,366 रुपये आकारले जातील. तर 350 cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठी विमा प्रीमियम 2,804 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

गोल्ड हॉलमार्किंग असणार पुढील टप्पा

गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 2022 मध्ये 1 जून 2022 पासून सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 20, 23 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसह आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. गोल्ड हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात नोडल एजन्सी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (BIS) 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केली होती.

गृह कर्ज महाग होणार 

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गृह कर्ज घेणार असाल किंवा घेतले असेल तर तुमचा खर्च आणखी वाढणार आहे. एसबीआयने गृह कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिग रेट (EBLR) 40 बेसिस पॉईंटने वाढवला आहे. हा रेट आता 7.05 टक्के इतका झाला आहे. तर, आरएलएलआर 6.65 टक्के प्लस सीआरपी असणार आहे. नवीन दर एक जून 2022 पासून लागू होणार आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक शुल्क लागू

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) दिलेल्या माहितीनुसार,  Aadhaar Enabled Payment System (AEPS) साठी  शुल्क लागू करण्यात आले आहे. 15 जून 2022 पासून हे शुल्क लागू होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारतीय पोस्ट खात्याची एक सहाय्यक कंपनी असून पोस्ट विभागाकडून संचलित केली जाते. 

नव्या नियमांनुसार,  दर महिन्याला पहिले तीन AEPS व्यवहार विनामूल्य असतील, ज्यात AEPS रोख पैसे काढणे, AEPS रोख ठेव आणि AEPS मिनी स्टेटमेंट यांचा समावेश आहे. विनामूल्य व्यवहारांनंतर, प्रत्येक रोख पैसे काढणे किंवा रोख ठेवीवर 20 रुपये अधिक GST लागू होईल, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारावर 5 रुपये अधिक GST इतके शुल्क लागू होतील.

महत्त्वाच्या बातम्या

Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टच्या निर्णयानं खळबळ, 60000 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास सांगणार, भारतातील कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं
मायक्रोसॉफ्टच्या एका निर्णयानं खळबळ, 60000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, भारतात मायक्रोसॉफ्टचे किती कर्मचारी? 
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Mumbai Water supply news: मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
Embed widget