(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चिंता सोडा! 'हा' एक फंडा तुम्हाला कर्जातून लवकर करू शकतो मुक्त, व्याजदर कमी होणार, पैसेही वाचणार
कर्जाचा हफ्त किंवा व्याजदर कमी करायचा असेल तर बॅलेन्स ट्रान्सफर करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. पण हा पर्याय निवडताना काही काळजीदेखील घेणे गरजेचे आहे.
मुंबई : पर्सनल लोनर (Personal Loan) बँका मोठा व्याजदर आकारतात. तरीदेखील अशा प्रकारच्या कर्जाची मागणी खूप आहे. तुम्ही वेळोवेळी कर्जाचे हफ्ते फेडत असाल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर काही मिनिटांत तुम्हाला हे पर्सनल लोन मिळते. मात्र अशाच प्रकारच्या उच्च व्याजदराचा बोझा कमी करण्यासाठी बॅलेन्स टॅान्सफर (Balance Transfer) हा चांगला पर्याय ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर बॅलेन्स ट्रान्सफर म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहे? हे जाणून घेऊ या...
बॅलेन्स ट्रान्सफर म्हणजे काय? (What Is Balance Transfer)
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास बॅलेन्स ट्रान्सफर म्हणजे तुमच्यावर असलेले कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणए होय. जेव्हा समोरची बँक तुम्हाला विद्यमान बँकेपेक्षा कमी व्याजदर देत असेल तरच बॅलेन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडणे योग्य ठरते. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर विद्यमान बँकेच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजाने दुसरी बँक तुम्हाला कर्ज देईल. दुसऱ्या बँकेत कर्ज ट्रान्सफर केल्यामुळे ईएमआय कमी होतो. तसेच कमी व्याजदराचाही फायदा तुम्हाला होतो.क
बॅलेन्स ट्रान्सफरचे प्रमुख फायदे काय? (Benefits of Balance Transfer)
तुम्ही कर्जाची परतफेड करत असताना बॅलेन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडू शकता. बॅलेन्स ट्रान्सफर केल्यामुळे व्याजदारात घट होते. पर्यायाने तुम्हाला आर्थिक फायदा होतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका अशा प्रकारे कमी व्याजदराची ऑफर देतात. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही आणखी वॅजदर कमी करण्याची विनंती बँकेला करू शकता.
या गोष्टींची घ्या विशेष काळजी?
जास्त व्याजदर असलेले कर्ज कमी व्याजदर असलेल्या कर्जात रुपांतरीत करणे हा वरवर फार चांगली आणि आकर्षक बाब वाटते. पण असे करताना तुम्ही काही काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. बॅलेन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडण्याआधी तुम्ही तुमच्या जुन्या बँकेलादेखील व्याजदर कमी करण्याची विनंती करू शकता. तसेच बँलेन्स ट्रान्सफरचा निर्णय घेताना प्रोसेसिंग फी आणि अन्य छुप्या चार्जेसची माहिती जाणून घ्या. कर्जाचा हफ्ता कमी होतोय याची खात्री करूनच बॅलेन्स ट्रान्सफरचा निर्णय घ्यायला हवा.
(टीप- फक्त माहिती देणे हाच या लेखामागचा उद्देश आहे. याबाबतची अधिक महिती हवी असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
खुशखबर! EPFO देणार तब्बल 50 हजार रुपयांचं बोनस, पण पूर्ण करावी लागणार 'ही' अट!
'या' तीन बँकांचा विषय खोल! एका वर्षाच्या एफडीवर देतात तगडं व्याज!
अरे देवा! आता आरोग्य विमा धारकांचं टेन्शन वाढलं? लवकरच बसणार 'हा' मोठा आर्थिक फटका!