एक्स्प्लोर
'या' तीन बँकांचा विषय खोल! एका वर्षाच्या एफडीवर देतात तगडं व्याज!
एफडीच्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळवता येतो. मात्र त्यासाठी जास्तीत जास्त व्याज देणाऱ्या बँकेचा शोध घेणे गरजेचे आहे.
fd saving and interest (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, फ्री पिक)
1/5

आजही मुदत ठेव म्हणजेच एफडी हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मनला जातो. कोणताही धोका न पत्करता एका निश्चित काळानंतर चांगला परतावा मिळावा म्हणून लोक वेगवेगळ्या बँकांत एफडीच्या रुपात गुंतवणूक करतात. दरम्यान, आपल्या देशात वेगवेगळ्या बँका एफडीवर वेगवेगळं व्याज देतात. याच पार्श्वभूमीवर एफडीवर चांगले व्याज देणाऱ्या तीन बँकांबद्दल जाणून घेऊ या...
2/5

डीसीबी बँक लोकांना एफडीच्या रुपात गुंतवणुकीचा पर्याय देते. तुम्ही एका वर्षासाठी एफडीच्या रुपात पैसे गुंतवण्याचा विचार करत अशाल तर तुमच्यासाठी डीसीबी बँक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण ही बँक एका वर्षाच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देते. हाच व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के आहे.
Published at : 02 May 2024 12:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























