एक्स्प्लोर

CJI Bhushan Gavai : कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच पाहिजे; सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंबाबतही बोलले

CJI Bhushan Gavai : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि वाहनतळ इमारतीचे भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Show Quick Read
Key points generated by AI, verified by newsroom

CJI Bhushan Gavai : कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं पण नाशिक कोर्टाची इमारत (Nashik District Court Building Inauguration) बघितलीच पाहिजे, असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांनी केले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भूमिपूजनावेळी अपेक्षा व्यक्त केली होती. उद्घाटन कार्यक्रमाला आपण दोघे उपस्थित राहू, असे त्यांनी म्हटले होते. पण योग नव्हता, असे देखील त्यांनी म्हटले. शनिवारी (दि. 27) नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि वाहनतळ इमारतीचे भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून ते बोलत होते. 

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, नाशिकला सुंदर आणि आधुनिक इमारत मिळाली आहे. देशात कुठेही अशी इमारत नाही. बाहेरून सुंदर आहे. पण आतमध्ये कॉर्पोरेट लूक आहे. सरकारी इमारतीत आले असे वाटत नाही. प्रधान न्यायमूर्तीचे कक्ष सरन्यायाधीशांसारखे आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आणि उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. अभय ओक आणि इतरांनीही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूरच्या सर्किट बेंचसाठी मकरंद कर्णिक आणि विलास गायकवाड या दोघांनी काम केले. लोक टीका करतायत. महाराष्ट्र विकास कामात मागे आहे पण महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. देशातील कुठल्याही तालुक्यात अशी इमारत नसणार. महाराष्ट्राच्या बांधकाम विभागाचे मी कौतुक करतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजनावेळी अपेक्षा व्यक्त केली होती. उद्घाटन कार्यक्रमाला आपण दोघे उपस्थित राहू, असे त्यांनी म्हटले होते. पण योग नव्हता, असे त्यांनी म्हटले. 

नाशिकच्या कोर्टाची इमारत बघितली पाहिजे (CJI Bhushan Gavai) 

न्यायालय न्यायाधीशासाठी नाही तर वकील आणि पक्षकार यांच्यासाठी आहेत. वकील, पक्षकारांसाठी सुविधा आहेत. कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात, आपल्या केससाठी नाही पण नाशिकच्या कोर्टाची इमारत बघितली पाहिजे. समोर हेरिटेज बिल्डिंग आहे. त्यामागे नवीन इमारत आहे. हेरिटेज कक्ष तयार केला. त्यात दुसऱ्या, तिसऱ्या पिढीने योगदान दिले. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 च्या भाषणात सांगितले होते की, एक व्यक्ती एक मत या आधारावर  काम केले जावे. राजकीय लोकशाहीसोबत सामाजिक लोकशाही एकत्र येत नाही, तोपर्यंत उपयोग नाही, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. सामाजिक आणि आर्थिक समानता राखणे गरजेचे आहे. आपल्या राज्य घटनेने जो प्रवास केलाय तो चांगला केलाय. सामाजिक आणि आर्थिक समानता येईल यासाठी कायदे करण्यात आले. सामाजिक समानता राहील, यासाठी आपण पुढे काम कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.

आणखी वाचा 

PHOTOS : 310 कोटी खर्च, 45 न्यायालयीन सभागृह, एस्केलेटर; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन, नाशिक जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे तरी कशी?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget