एक्स्प्लोर

Twitter : भारतातील ट्विटर ऑफिसला टाळं, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना दिला 'हा' आदेश

Twitter Shuts Office Down : ट्विरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरची भारतातील मुंबई आणि दिल्लीतील ऑफिसं बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Elon Musk Shuts Office Down : भारतातील ट्विटर ऑफिसला टाळं (Twitter Offices in India) लागलं आहे. ट्विटरचे (Twitter) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरने भारतातील त्यांची दोन कार्यालये बंद केली आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आता कंपनीने मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) तील कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आलं आहे. याआधीही ट्विटरवरून मोठ्या प्रमाणात लोकांना कामावरून हटवण्यात आलं होतं.

Twitter Shuts Office Down : ट्विटरची भारतातील दोन कार्यालये बंद

ट्विटरने भारतात सुरु असलेली दोन कार्यालये बंद केली आहेत. भारतात ट्विटरी तीन कार्यालयं होती, त्यातील दोन कार्यालयांना आता कुलूप लागलं आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतातील 90 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. आता कंपनीने भारतातील तीनपैकी दोन कार्यालये बंद केली आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास (Work From Home) सांगितलं आहे. खर्च कमी करण्यासाठी (Cost Cutting) ट्विटरनं हे पाऊल उचललं आहे. 

Twitter Offices in India : बंगळुरूमधील कार्यालय पूर्वीप्रमाणेच सुरू

दरम्यान, गेल्या वर्षी ट्विटरने आपल्या भारतातील ट्विटर कार्यालयातील कर्मचाऱ्यांपैकी 90 टक्के कर्मचाऱ्यांना 2022 मध्ये नोकरीवरून (Twitter Layoff) काढून टाकलं. यामुळे 200 हून अधिक लोकांना याचा फटका बसला. या निर्णयानंतर कंपनीने मुंबई आणि नवी दिल्ली ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ट्विटर कंपनीचे बंगळुरूमधील कार्यालय पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

Twitter Office Shut Down : कर्मचाऱ्यांना काढून टाकणे आवश्यक 

ट्विटरचे मालक झाल्यानंतर काही आठवड्यांच्या आतच मस्क यांनी 7,500 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्यावर टिकाही झाली. मस्क यांनी कर्मचारी कपात करण्यावर प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, ट्विटरच्या अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणं आवश्यक आहे, कारण कंपनीला दरवर्षी ती अब्ज डॉलरचे नुकसान झाले असते. मस्क यांनी सांगितलं की, त्यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतलेल्या ट्विटर कंपनीचा खर्च कमी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Twitter Bird Logo : मस्क यांनी विकलं ट्विटरचं 'पाखरु'; ऑफिसमधील वस्तू विकण्याची वेळ, 'या' किमतीला झाली विक्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget