Rules Changing From 1 June 2023: आजपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम
Rules Changing From 1 June 2023: आजपासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे.
Rules Changing From 1 June 2023: आजपासून नवा महिना सुरू होत आहे. अशातच जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतींत बदल करतात. यासोबतच पीएनजी (PNG) आणि सीएनजीच्या (CNG) किमतीही बदलल्या जाऊ शकतात. यामुळे या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. जाणून घेऊयात आजपासून बदलणार असलेल्या नियमांबद्दल...
1. गॅस सिलेंडर, CNG आणि PNG च्या किमतींत बदल
तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी (LPG), सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किमती बदलतात. गेल्या दोन महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर एप्रिल आणि मे महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. जूनमध्ये तेल कंपन्या गॅसच्या किमतींत काही बदल करू शकतात.
2. 100 दिवस 100 पेमेंट मोहीमेला सुरुवात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अनक्लेम्ड रक्कम परत करण्यासाठी 100 दिवस 100 पेमेंट मोहीम सुरू केली आहे. याद्वारे RBI नं बँकांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेतील किमान 100 अनक्लेम्ड डिपॉजिट ठेवी ग्राहकांना 100 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. याद्वारे आरबीआय इनअॅक्टिव आणि अनक्लेम्ड रकमेची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
3. इलेक्ट्रिक टू व्हीलर महागणार
जर तुम्ही या महिन्यात इलेक्ट्रिक टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाप बसणार आहे. 1 जूनपासून इलेक्ट्रिक स्कूटर्स महाग होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयानं 21 मे 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली होती की, सरकार आता या वाहनांवरील अनुदान कमी करणार आहे. यापूर्वी या वाहनांवर 15,000 रुपये प्रति किलोवॅट अनुदान उपलब्ध होतं, ते आता 10,000 रुपये करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, जून 2023 पासून, या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा खर्च 25,000 ते 30,000 रुपयांनी महाग होणार आहे.
4. कफ सिरपची चाचणी होणार
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) नं जाहीर केलं आहे की, 1 जूनपासून भारतातून निर्यात केलेल्या सर्व खोकल्याच्या सिरपची अनिवार्यपणे चाचणी केली जाईल. औषध निर्यातदारांना सर्वात आधी औषधाची शासकीय प्रयोगशाळेत चाचणी करून चाचणी अहवाल दाखवावा लागेल. त्यानंतरच ते औषध निर्यात करू शकतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :