एक्स्प्लोर

LPG Gas Cylinder Price: LPG गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त, पाहा Latest Rates

LPG Gas Cylinder Price: 1 जून 2023 पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर 83 रुपयांनी कमी झाले आहेत.

LPG Cylinder Price Reduce: एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) मोठी घट झाली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर (Cylinder Price) पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता.

नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1773 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. 1 जूनपासून, बदललेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 1773 रुपयांना विकला जात आहे. आणि 1 जून रोजी कोलकातामध्ये 1875.50 रुपयांना मिळत आहे. 

मुंबईतील दर काय? 

मुंबईत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर 1725 रुपयांना विकला जात आहे, तर चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1973 रुपये आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1856.50 रुपयांवरून 83.50 रुपयांनी कमी होऊन 1773 रुपयांनी विकला जात आहे. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस 83.50 रुपयांनी स्वस्त झाला असून 1808.50 रुपयांवरून 1725 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. तसेच, चेन्नईमध्ये एलपीजी गॅस 2021.50 रुपयांवरून 84.50 रुपयांनी घसरून 1937 रुपयांवर पोहोचला आहे.

घरगुती सिलेंडरच्या किमती काय? 

गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी मार्चमध्ये घरगुती सिलेंडरच्या किमतींत बदल करण्यात आला होता. त्यानंतर घरगुती सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजीच्या किमती मुंबईमध्ये 1102.5 रुपये, दिल्लीमध्ये 1103 रुपये, लेहमध्ये 1340, भोपाळमध्ये 1108.5, जयपूरमध्ये 1106.5, बंगळुरूमध्ये 1105.5 रुपये आणि श्रीनगरमध्ये 1219 रुपये इतकी आहे.

विमान प्रवास स्वस्त होणार? 

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये दिलासा देण्याबरोबरच जेट इंधनाच्या (एअर फ्युएल) किमतीतही तेल कंपन्यांनी कपात केली आहे. किंमतीत सुमारे 6,600 रुपयांची घट झाली आहे. याचा परिणाम आगामी काळात विमान प्रवासावर होऊ शकतो. 1 जूनपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतींत कोणताही बदल केलेला नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rules Changing From 1 June 2023: आजपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Satara Politics : सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
Embed widget