मोठी बातमी! देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीला 11909 कोटींचा नफा, गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर
देशातील सर्वात मोठी IT कंपनी Tata Consultancy Services ने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीला मोठा नफा झाला आहे.
TCS Q2 : देशातील सर्वात मोठी IT कंपनी Tata Consultancy Services ने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 8 टक्क्यांनी वाढून 64,259 कोटी रुपये झाले आहे. तर कंपनीला 11909 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 10 रुपयांचा लाभांश देखील जाहीर केला आहे.
कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 64,259 कोटी
TCS ने त्रैमासिक निकाल जाहीर केले आहेत. TCS ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 64,259 कोटी आहे. जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 59,692 कोटींच्या महसुलापेक्षा 8 टक्के अधिक आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 11909 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 11,342 कोटी रुपये होता. कंपनीने आपल्या भागधारकांना भेटवस्तू दिली असून दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. TCS आपल्या भागधारकांना प्रति शेअर 10 रुपये लाभांश देईल आणि तो 5 नोव्हेंबर रोजी दिला जाईल. 18 ऑक्टोबर ही लाभांश ठरवण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे.
रतन टाटा यांच्या निधनामुळं कंपनीने पत्रकार परिषद पुढे ढकलली
जागतिक अनिश्चिततेच्या दरम्यान, आमच्या सर्वात मोठ्या उभ्या BFSI ने पुनर्प्राप्ती दर्शविली आहे. आमच्या वाढीच्या बाजारपेठेतही मजबूत कामगिरी दिसून आली आहे. आमचे ग्राहक, कर्मचारी आणि इतर भागधारकांसाठी आमचे मूल्य अधिक सुधारण्यावर आम्ही भर देत आहोत. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आजच्या सत्रात टीसीएसचा शेअर 0.6 टक्क्यांच्या घसरणीसह 4228 रुपयांवर बंद झाला. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनामुळे टाटा समूहात शोककळा पसरली आहे. दरम्यान टीसीएसने आपले त्रैमासिक निकाल जाहीर केले आहेत. मात्र, कंपनीने निकालाबाबतची पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे.
महत्वाच्या बातम्या: