एक्स्प्लोर

टीसीएस 40, इन्फोसिस 20 तर विप्रो 10 हजार फ्रेशर्सना जॉब देणार, आयटी कंपन्यांत नोकरीची तरुणांना पुन्हा संधी!

आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिनाऱ्यांसाठी लवकरच चांगले दिवस येणार आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या तरुणांना नोकरी देणार आहेत.

Hiring in IT Companies : गेल्या काही दिवसांपासून भारतासह जगभरात आयटी क्षेत्रातून चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत होत्या. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी भरती प्रक्रिया थांबवलेली होती. तसेच अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशा स्थितीत आयटी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांची स्थिती चांगलीच वाईट झाली होती. आता मात्र आयटी कंपन्यांनी पुन्हा एकदा तरुणांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. भारतातील आयटी कंपन्या लवकरच फ्रेशर्सना नोकरीच संधी देणार आहेत. आयटी कंपन्यांकडून आता कॅम्पस इन्टरव्ह्यू घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. यावेळी आयटी कंपन्या क्लाऊड कॉम्यूटिंग, टेडा आणि एआय या क्षेत्रात ज्ञान असणाऱ्यांना संधी देणार आहेत.

आयटी कंपन्या कॅम्पस इन्टव्ह्यू राबवणार  

आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडून राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेविषयी बिझनेस टुडेने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सध्या आयबीएम (IBM), इन्फोसिस (Infosys), टीसीएस (TCS) आणि एलटीआयमाइंडट्री  (LTIMindtree) या कंपन्यां लवकरच कॅम्पस इंटरव्ह्यू घेणार आहेत. त्यासाठी या कंपन्यांकडून कॉलेजेसना भेट दिली जात आहे. यावेळी मात्र निवड प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार आहे. 

आयटी क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्या यावेळी मात्र काही निवडक तरुणांनाच नोकरीची संधी देणार आहेत. यावेळी प्रामुख्याने क्लाउड कंप्यूटिंग (Cloud Computing), डेटा अॅनालिटिक्स (Data Analytics) आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची (Artificial Intelligence) माहिती असणाऱ्यांना नोकरी दिली जाऊ शकते. त्यासाठी तरुण-तरुणींना 6 ते 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाऊ शकते. 

ऑफ कॅम्पस जॉयनिंगही वाढणार 

आगामी वर्षाच्या जुलै महिन्यापासून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. यासह अनेकांना ऑफ कॅम्पसच्या माध्यमातूनही नोकरी दिली जाणार आहे. यामध्ये टीसीएस कंपनीकडून 40 हजार, इन्फोसिस कंपनीकडून 20 हजार तर विप्रो (Wipro) या कंपनीकडून 10 हजार फ्रेशर्सना नोकरीवर घेतले जाणार आहे. त्यासाठी या कंपन्यांकडून तयारी केली जात आहे. विप्रो कंपनीत होणाऱ्या भरतीबाबत एचआर हेड सौरभ गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वर्षानंतर आता आम्ही पुन्हा एकदा कॅम्पस हायरिंग चालू करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी कॅम्पस हायरिंग करताना गुणांची किमान मर्यादा ही 60 टक्क्यांहून 70 टक्के होऊ शकते. 

स्कील तसेच सोशल मीडियावर राहणार नजर 

यावेळच्या कॅम्पस हायरिंगमवेघील शिक्षण, कौशल्य यासोबतच समाजमाध्यम खात्यावरही या कंपन्यांची नजर असणार आहे. उमेदवाराची संपूर्ण माहिती घेण्याचा यामागे प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रआत करिअर करू इच्छीनाऱ्यांसाठी यावेळी कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची उत्तम सधी आहे. 

हेही वाचा :

हा आठवडा महत्त्वाचा, पैसे ठेवा तयार, एक-दोन नव्हे तर तब्बल 11 दमदार आयपीओ येणार!

आयपीओची चर्चा चालू असतानाच आता OYO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट अमेरिकेची हॉटेल कंपनी खरेदी करणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Amit Shah :  'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Nagpur Tour : ठाकरे - पवार टार्गेट? नागपूरच्या बैठकीत अमित शाह काय म्हणाले?Ware Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 24 Sept 2024Top 100 Headlines : दिवसभरातील शंबर बातम्या एका क्लिकवर : 24 September 2024  : ABP MajhaKolhapur Patne King Cobra : कोल्हापुरातील पाटणे वनपरिक्षेत्रात आढळला 13 फुटांचा किंग कोब्रा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Amit Shah :  'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Amit Shah: 'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
Embed widget