एक्स्प्लोर

Tata Technologies Ipo : तुम्हाला टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओची लॉटरी लागली? असं चेक करा अलॉटमेंट स्टेट्स

Tata Technologies Ipo Share Allotment : टाटा समूहाच्या या आयपीओने एकाच वेळी अनेक विक्रम मोडीत काढले. टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला आतापर्यंत सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.

Tata Technologies News : टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies) मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) IPO शेअर्स अलॉटमेंट करण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांना आयपीओद्वारे शेअर्स हे लॉटरी पद्धतीने देण्यात आले आणि संपूर्ण प्रक्रिया रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली पार पडली असल्याचे वृत्त आहे. टाटा समूहाचा (Tata Group) 19 वर्षांतील हा पहिला IPO होता आणि त्याला गुंतवणूकदारांकडून उत्साहाने प्रतिसाद मिळाला. कंपनीचा 3,042.5 कोटी रुपयांचा IPO शुक्रवारी शेवटच्या दिवशी 69.43 वेळा सबस्क्राइब झाला. कंपनीने यासाठी ऑफरची किंमत निश्चित केली आहे. टाटा मोटर्सच्या (Tata Motors) या कंपनीने प्रति इक्विटी शेअर 500 रुपये निश्चित केले आहेत.

टाटा समूहाच्या या आयपीओने एकाच वेळी अनेक विक्रम मोडीत काढले. टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला आतापर्यंत सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. टाटा टेक्नोलॉजीने 475 ते 500 रुपये प्रति शेअर किंमत बॅण्ड ठेवण्यात आला होता. टाटा टेक्नोलॉजीचा शेअर्स ग्रे मार्केटमध्ये सध्या 420 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. म्हणजेच ते 920 रुपयांमध्ये सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. शेअर्सचे वाटप 28 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी होऊ शकते. त्याची सूची 30 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी होऊ शकते. टाटा समूहाचा 19 वर्षांतील हा पहिला IPO आहे. यापूर्वी 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा आयपीओ आला होता.

>> असं चेक करा अलॉटमेंट स्टेट्स Tata Technologies Ipo Share Allotment

ज्या गुंतवणूकदारांनी टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओसाठी अर्ज केला आहे. ते आयपीओ अलॉटमेंट स्टेट्स पुढील प्रकारे तपासू शकता. 

बीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. www.bseindia.com/investors/appli_check.aspx.वर जा. 

आता पुढील पानावर ‘इक्विटी’ चा पर्याय निवडा. 

आता ड्रॉपडाउनमध्ये ‘टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ’ हा पर्याय निवडा. 

नवीन पेज ओपन झाल्यावर तुमचा अर्ज क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक आदी तपशील भरा.

'मी रोबोट नाही' वर क्लिक करा. 

आता सबमिट बटणावर क्लिक करा. 

आता Tata Technologies IPO शेअर अलॉटमेंटबाबतची स्थिती समजेल. 

>> रजिस्ट्रार पोर्टलवर पाहा स्टेट्स 

तुम्ही रजिस्ट्रार पोर्टलद्वारेही आयपीओ अलॉटमेंट स्टेट्स चेक करू शकता. 

IPO रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड https://linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html या पोर्टलवर जा.

आता ड्रॉपबॉक्समधून टाटा टेक्नॉलॉजी आयपीओ निवडा. 

आता अर्ज क्रमांक, डीमॅट खाते क्रमांक किंवा पॅन क्रमांक निवडा. 

इश्यू प्रकारात ASBA आणि गैर-ASBA मधील निवडा. 

आता तपशील नमूद करा, कॅप्चा भरा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा. 

आता तुम्हाला आयपीओ अलॉटमेंट स्टेट्सची स्थिती समजून येईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget