एक्स्प्लोर

Adani Group: सुप्रीम कोर्टाच्या कमिटीकडून अदानी समूहाला क्लीन चिट, शेअर दरात तेजी

Adani Group: अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने क्लिन चीट दिली आहे.

Adani Group Supreme Court: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल समोर आला आहे. समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, प्रथमदर्शनी विद्यमान नियमांचे किंवा कायद्यांचे कोणतेही उल्लंघन आढळले नाही. हा अहवाल सार्वजनिक होताच अदानी समूहाच्या (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. अदानी पॉवर (Adani Power) आणि अदानी ग्रीनच्या (Adani Green) शेअर्सना प्रत्येकी पाच टक्क्यांच्या तेजीसह अप्पर सर्किट लागले. शुक्रवारी सकाळी शेअर  व्यवहारात अदानीचे शेअर्स कमजोर दिसत होते. मात्र सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल समोर येताच शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

नियमांचे उल्लंघन नाही

सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालात अदानी समुहाने सर्व लाभकारक अशा सर्व भागीदारांबाबतची माहिती जाहीर केलेली आहे. अदानी समूह लाभार्थ्यांची नावे जाहीर करत नसल्याचा ठपका सेबीने ठेवलेला नाही, असेही सांगण्यात आले आहे. सध्याच्या नियमांचे किंवा कायद्याचे कोणतेही प्रथमदर्शनी उल्लंघन झालेले नाही, असे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय, हिडनबर्ग अहवालानंतर काही कंपन्यांनी अल्पावधीत समभाग विक्रीतून अल्पावधीत कमावलेल्या नफ्याची चैकशी होणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मालमत्ता व्यवस्थापनांतर्गत विविध 13 परकीय संस्था तसेच 32 भागधारकांबाबतची पुरेशी माहिती सेबीकडे अद्याप नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा 13 संस्थांबाबतची थकित चौकशी पुढे करावयाची किंवा नाही हे सेबीवर समितीने सोपवले आहे. त्याशिवाय, संबंधित प्रकरण सक्तवसुली संचलनालयाकडे (ED) सोपविण्याबाबत सेबीने कोणतेही मुख्य आरोप केले नसल्याचे आढळून आले आहे.

सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने म्हटले की, आर्टिफिशियल किंवा कृत्रिमपणे ट्रेडिंग केल्याचे पॅटर्न दिसून आले नाही. त्याशिवाय अदानी समूहातील कंपन्यांच्या ट्रेडिंगमध्ये काही गडबड असावी, असेही आढळून आले नाही. सेबीला असे आढळून आले की काही कंपन्यांनी हिंडेनबर्ग अहवाल येण्यापूर्वीच शॉर्ट पोझिशन घेतल्या होत्या. अहवाल आल्यानंतर अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती घसरल्याचा त्यांनी फायदा घेतला. समितीने नमूद केले की अदानी समूहाच्या शेअर दराचे स्टॉक मार्केटने पुनर्मूल्यांकन केले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर दरात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून आली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget