(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रंगीबेरंगी कोबीचा अनोखा प्रयोग, युवा शेतकऱ्याने मिळवले लाखो रुपये
एका शेतकऱ्याने रंगी-बेरंगी कोबीची लागवड (Cultivation of colorful cabbage) करुन लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. राजकुमार चौधरी (Rajkumar Chaudhary) असं बिहारमधील मुझफ्फरपूर येथील शेतकऱ्याचं नाव आहे.
Success Story : अलीकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण आशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या शेतकऱ्याने रंगी-बेरंगी कोबीची लागवड (Cultivation of colorful cabbage) करुन लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. राजकुमार चौधरी (Rajkumar Chaudhary) असं बिहारमधील मुझफ्फरपूर येथील शेतकऱ्याचं नाव आहे.
पांढऱ्या कोबीच्या तुलनेत रंगीत कोबीची लागवड करुन अधिक उत्पन्न मिळत असल्याचे राजकुमार चौधरी यांनी सांगितले. कारण ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पांढऱ्या कोबीची लागवड करण्यासाठी 300 रुपये खर्च झाला, तर रंगीत कोबीच्या लागवडीसाठी 1300 रुपये खर्च झाले, मात्र बाजारात त्याची किंमतही जास्त असल्याचे चौधरी म्हणाले.
एका वर्षात 15 लाख रुपयांहून अधिक नफा
मुझफ्फरपूर (बिहार) येथील शेतकरी राजकुमार चौधरी रंगीबेरंगी कोबी पिकवून चांगली कमाई करत आहेत. चौधरी यांनी पांढरा, निळा, हिरवा, जांभळा, पिवळा आणि केशरी रंगाच्या कोबीचे उत्पन्न घेतलं आहे. चौधरी यांनी त्यांच्या चखेलाल गावात कोबीची लागवड केली आहे. याद्वारे ते एका वर्षात 15 लाख रुपयांहून अधिक नफा कमावत आहेत. पारंपारिक पिकांच्या तुलनेत रंगीत कोबीच्या लागवडीत अनेक पटींनी अधिक नफा मिळत असल्याची माहिती त्यांनी सांगितली. रंगीबेरंगी कोबी असल्याने लोक ते अधिक खरेदी करतात.
कोबीच्या विविधतेमुळं बाजारपेठेच्या सौंदर्यात भर
चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे तीन प्रकारचे कोबी आहेत. यामध्ये इंग्लंड, तैवान आणि जपानचा समावेश आहे. ज्याचा रंग लाल, पिवळा हिरवा आहे. बाजारात त्याची किंमत 80 रुपये ते 100 रुपये किलोपर्यंत आहे. कोबीची ही विविधता सध्या बाजारपेठांच्या सौंदर्यात भर घालत आहे. या कोबीच्या रंगामुळे त्यात काहीतरी खास आहे याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. या रंगीबेरंगी कोबीपासून बनवलेली भाजी अतिशय चविष्ट लागते. दरम्यान, या कोबीची लागवड नोव्हेंबर महिन्यात केली जाते आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यात बाजारात विक्री केली जाते. नुकतीच पाच रंगांची कोबीची लागवड केल्याची माहिती चौधरी यांनी दिली. त्यापैकी तीन रंग तयार आहेत. 80 रुपये प्रति किलो दराने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. बाजारात रंगीत कोबी 100 ते 120 रुपये किलोने विकली जाते.
दरम्यान, राजकुमार चौधरी यांना नाविन्यपूर्ण शेतीसाठी दोनदा बेस्ट ॲग्रिकल्चर परफॉर्मन्स अवॉर्डही मिळाला आहे. राजकुमार चौधरी यांनी इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतले आहे. यानंतर ते कृषी क्षेत्रात मास्टर ट्रेनरही आहेत. त्यांना 2002 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कृषी कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या: