एक्स्प्लोर

चहा विकून मजुराचा मुलगा झाला IPS ते IAS, 3 वेळा UPSC उत्तीर्ण;  हिमांशू गुप्तांची प्रेरणादायी यशोगाथा

अत्यंत गरिबीत बालपण घालवलेल्या उत्तराखंडमधील हिमांशू गुप्ता (success story) या अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास कसा झाला याची माहिती आपण घेणार आहोत. चहा विक्रीचा व्यवसाय करुन ते IPS ते IAS झाले आहेत. 

Success Story : अत्यंत गरिब परिस्थितीतून अनेक मोठे अधिकारी घडल्याच्या यशोगाथा आपणा वाचल्याच असतील. आज आपण अशीच एक यशोगाथा पाहणार आहोत. अत्यंत गरिबीत बालपण घालवलेल्या उत्तराखंडमधील हिमांशू गुप्ता (success story) या अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास कसा झाला याची माहिती आपण घेणार आहोत. चहा विक्रीचा व्यवसाय करुन ते IPS ते IAS झाले आहेत. 

हिमांशू गुप्ता यांना शाळेत जाण्यासाठी दररोज 70 किमी प्रवास कारावा लागत होता. एवढेच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी चहाच्या दुकानात कामही केले होते. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. उत्तराखंडच्या हिमांशू गुप्ता हे आपल्या मेहनतीच्या बळावर UPSC परीक्षा (UPSC Civil Service Exam) उत्तीर्ण झाले आहेत. आज ते IAS अधिकारी बनले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटी असेल तर यश कसं मिळत हे त्यांच्या संबंध आयुष्यातून समजतं.यूपीएससी उत्तीर्ण करुन आयएएस झालेल्या हिमांशू गुप्ता यांचे वडील रोजंदारीवर काम करायचे. तसेच जास्तीचे पैसे मिळवण्यासाठी ते चहा देखील विकत होते. तरीही त्यांनी आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवण्यासाठी कशाचीही कमी पडू दिली नाही. 

अधिकारी हिमांशू गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत जाण्यापूर्वी ते वडिलांसोबत काम करायचे. शाळा 35 किमी अंतरावर होती, येण्या-जाण्याचे अंतर 70 किमी होते. मी माझ्या वर्गमित्रांसह व्हॅनमध्ये जात होतो. जेव्हा जेव्हा माझे वर्गमित्र आमच्या चहाच्या स्टॉलजवळून जात असत तेव्हा मी लपून बसायचो. पण एकदा कोणीतरी मला पाहिलं आणि मजा करायला सुरुवात केली. मला 'चायवाला' म्हटले जाऊ लागले. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. मला वेळ मिळेल तेव्हा माझ्या वडिलांना मदत केली. आमचे घर चालवण्यासाठी आम्ही मिळून दिवसाला 400 रुपये मिळवायचो, अशी माहिती हिमांशू गु्तांनी दिली.

इंग्रजी येत नव्हते, म्हणून इंग्रजी चित्रपटांच्या डीव्हीडी विकत घेतल्या

माझी स्वप्ने मोठी होती. मी शहरात राहण्याचे आणि माझे आणि माझ्या कुटुंबासाठी चांगले जीवन जगण्याचे स्वप्न पाहिले होते असे हिमांश गुप्ता म्हणाले.स्वप्ने सत्यात उतरवायची असतील तर अभ्यास कर असे वडील सांगायचे. जर मी कठोर अभ्यास केला तर मला प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळेल. पण मला इंग्रजी येत नव्हते, म्हणून मी इंग्रजी चित्रपटांच्या डीव्हीडी विकत घ्यायचो आणि शिकण्यासाठी त्या बघायचो असे हिमांशू गुप्तांनी सांगितलं. मी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले आणि मला हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. 

परदेशात पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली, पण

माझ्यामध्ये शिकण्याची भूक होती. माझे शिक्षणाचे ओझे मी कधीच पालकांवर दिले नसल्याचे हिमांशू म्हणाले. मी माझ्या कुटुंबात पदवीधर होणारी पहिली व्यक्ती असल्याचे ते म्हणाले. पदवीला मी माझ्या विद्यापीठात अव्वल आलो. त्यामुळं मला परदेशात पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. पण मी ते नाकारले. कारण मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नव्हतो. हा माझा सर्वात कठीण निर्णय होता, पण मी राहिलो आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला.

यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी

सुरुवातीला हिमांशू गुप्ता यांनी कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लास लावले नाहीत. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात ते अयशस्वी झाले. परंतू, आयएएस अधिकारी बनण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ झाला. मग मी दुप्पट मेहनत केली आणि आणखी 3 प्रयत्न केले. मीही परीक्षा उत्तीर्ण झालो, पण रँक मिळाला नाही. पण चौथ्या प्रयत्नानंतर मी शेवटी आयएएस अधिकारी झाल्याचे गुप्ता म्हणाले. अधिकारी झाल्यावर आई म्हणाली की,  'बेटा, आज तू आम्हाला प्रसिद्ध केलेस. आपला पगार आई-वडिलांना देणे हा देखील एक अविस्मरणीय क्षण होता असे ते म्हणाले.

हिमांशू गुप्ता तीन वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण

हिमांशू गुप्ता यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, जेव्हा त्याची भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) साठी निवड झाली. त्याने 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलिस सेवेसाठी (IPS) निवड झाली. त्यानंतर 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्याची भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाली.

महत्वाच्या बातम्या:

व्हायचं होतं सैनिक पण झाला गवंडी, आता मिळाली 1.37 लाख पगाराची ऑफर; बदलणार आर्थिक स्थिती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVEPravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूटChandrpur Tiger : जेव्हा वाघोबा वाट अडवतो, मामा मेल वाघाचा व्हिडिओ व्हायरलABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 19 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Embed widget