कर्ज घेऊन व्यवसायाची सुरुवात, आज 17 हजार कोटींच्या कंपनीचे मालक; TS कल्याणरामन यांची यशोगाथा
ज्वेलरी ब्रँडचे (Jewellery Brands) प्रमुख टीएस कल्याणरामन (TS Kalyanaraman).कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय उभारला होता. आज ते 17 हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत.
Success Story: प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य या बळावर अनेकजण आपल्या उद्योगात यशस्वी होतात. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात. यातीलच एक नाव म्हणजे ज्वेलरी ब्रँडचे (Jewellery Brands) प्रमुख टीएस कल्याणरामन (TS Kalyanaraman). कल्याणरामन यांनी सुरुवातीला कर्ज घेऊन शून्यातून सुरुवात केली होती. आज ते 17 हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत.
अनेक शहरांमध्ये ज्वेलरी ब्रँडच्या शाखा
कल्याण ज्वेलर्सचा व्यवसाय देशातील अनेक शहरांमध्ये आहे. अनेक शहरांमध्ये या कंपनीच्या शाखा आहेत. या ज्वेलरी ब्रँडचे नाव सर्वांनी ऐकले असेलच. कल्याणरामन यांचा जन्म 23 एप्रिल 1947 रोजी केरळमधील त्रिशूर येथे झाला आहे. चांगली मेहनत घेऊन काम केलं तर स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात. शून्यातून सुरुवात करुन अनेक लोक मोठ्या उंचीवर पोहोचले आहेत. या लोकांपैकी एक म्हणजे व्यापारी घराण्याचे कल्याणरामन (टीएस कल्याणरामन). व्यवसायाशी कौटुंबिक संबंध असूनही त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. ज्यासाठी त्यांनी कर्ज काढून सोन्याचे दुकान उघडले. त्यांची कंपनी आज दागिन्यांचा मोठा ब्रँड बनला आहे.
व्यवसाय देशभर
कल्याणरामन यांचे वडील टीआर सीतारामय्या हे कपड्यांचे मोठे व्यापारी होते. त्यांचे आजोबा पूर्वी पुजारी होते. पण नंतर त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. कल्याणरामन यांनी वयाच्या 12 व्या वर्षी वडिलांकडून व्यवसायातील गुंतागुंत शिकण्यास सुरुवात केली. ते वडिलांना त्याच्या दुकानात मदत करत होते. त्यांनी केरळच्या श्री केरळ वर्मा कॉलेजमधून वाणिज्य विषय घेऊन पदवी पूर्ण केली.
कल्याण ज्वेलर्सची देशातील अनेक राज्यात 200 हून अधिक दुकाने
वडिलांचा घरात मोठा व्यवसाय असूनही कल्याणरामन यांना त्या व्यवसायात रस नव्हता. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी अभ्यास करून 25 लाखांचा निधी गोळा केला. त्यांना सोन्याचे दुकान उघडायचे होते. ज्यासाठी जमा केलेला निधी कमी होता. त्यामुळं त्यांनी बँकेकडून पन्नास लाख रुपयांचे कर्ज घेतले. कर्जाचे पैसे आणि आपली बचत यातून कल्याणरामन यांनी त्रिशूरमध्ये कल्याण ज्वेलर्स नावाने दागिन्यांचे दुकान उघडले. ते यशस्वी करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलं. हळुहळू त्यांनी केरळमधून इतर राज्यातही व्यवसाय सुरू केला. आज कल्याण ज्वेलर्सची देशातील अनेक राज्यांमध्ये 200 हून अधिक दुकाने आहेत.
महत्वाच्या बातम्या:
5 गायींपासून सुरुवात, आज 46 गायींचा गोठा; दुग्ध व्यवसायातून महिला महिन्याला कमावतेय 7 लाख रुपये