एक्स्प्लोर

5 गायींपासून सुरुवात, आज 46 गायींचा गोठा; दुग्ध व्यवसायातून महिला महिन्याला कमावतेय 7 लाख रुपये 

Success story : एका महिलेनं गाय पालनातून (Cow Rearing) लाखो रुपयांचा नफा कमावला आहे. सध्या या महिलेकडे 46  गायी आहेत.

Success story : देशातील प्रत्येक क्षेत्रात परुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करताना दिसत आहेत. प्रत्यके क्षेत्रात महिलांचा मोठा सहभाग असतो. देशातील महिला आता स्वावलंबी होत आहेत. महिला या शिक्षण क्षेत्रासह शेती क्षेत्रातही मोठं काम करत आहेत. आज आपण एका स्वावलंबी महिलेबद्दल माहिती पाहणार आहोत. कर्नाटक (Karnataka) जिल्ह्यातील राजेश्वरी नावाच्या एका महिलेनं गाय पालनातून (Cow Rearing) लाखो रुपयांचा नफा कमावला आहे. सध्या या महिलेकडे 46  गायी आहेत. दररोज 600 लिटरहून अधिक दुधाची (Milk) विक्री केली जाते. या माध्यमातून प्रत्येक महिन्याला त्यांना सात लाख रुपयांचा नफा मिळत आहे. दरम्यान, या महिलेपासून प्रेरणा घेऊन अनेक महिलाही गायी पाळत आहेत.

5 गायींसह दुग्धव्यवसायाला केली होती सुरुवात

राजेश्वरी यांचे वय 43 वर्षे आहे. राजेश्वरी या कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कोरटागेरे तालुक्यातील रहिवासी आहे. डेअरी क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलं आहे. राजेश्वरी यांनी पाच वर्षांपूर्वी अवघ्या 5 गायींसह दुग्धव्यवसाय सुरु केला. आज, राजेश्वरीने परिश्रमपूर्वक तिच्या फार्मचे रूपांतर एका मोठ्या उद्योगात केले आहे. आता त्यांच्याकडे 46 गायी आहेत. या गायी दररोज 650 लिटर दूध देतात. डेअरी क्षेत्रातील तिच्या कामगिरीबद्दल, इंडियन डेअरी असोसिएशन (IDA) ने तिला गेल्या आठवड्यात बंगळुरुमधील बेस्ट वुमन डेअरी फार्मर पुरस्काराने सन्मानित केले आहे.

2019 मध्ये गाय पाळण्यास सुरुवात 

राजेश्वरीची यशोगाथा 2019 मध्ये सुरू झाली, जेव्हा वयाच्या 39 व्या वर्षी तिने घरी गाय पाळण्यास सुरुवात केली. हा मार्ग चारा पुरवठ्यापासून पशुवैद्यकीय काळजी घेण्यापर्यंतच्या आव्हानांनी भरलेला होता. विशेष म्हणजे कोरटगे हा दुष्काळग्रस्त भाग आहे. येथे चारा व पाण्याची टंचाई आहे. असे असतानाही राजेश्वरीने गाय पाळण्याचे ठरवले. सहा एकर जागेवर मका आणि कापूस बियाणे पिकवण्यासाठी शेजारील शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमीन घेतली आणि गुरांना हिरवा चारा आणि धान्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी लागवड केली. याचा त्यांना चांगलाच फायदा झाला.

महिन्याला सात लाख रुपयांचा नफा

राजेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहनत आणि दर्जेदार चारा लागवडीमुळं नफ्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. यानंतर त्यांनी हळूहळू गायींची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजियन जातीच्या गायी आहेत, कारण त्या त्यांच्या उच्च दूध क्षमतेसाठी ओळखल्या जातात. राजेश्वरीने यांच्याकडे आज 46 गायी आहेत. राजेश्वरीचे फार्म कर्नाटक मिल्क फेडरेशनला (KMF) दररोज 650 लिटर दूध पुरवते, ज्यामुळे मासिक 7 लाख रुपये उत्पन्न मिळते.

राजेश्वरी यांनी अनेक पुरस्कार

आपल्या गायींची योग्य काळजी घेण्यासाठी त्यांनी सुमारे चार कामगारांना कामावर ठेवले आहे. राजेश्वरी म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबरच मला उन्हाळ्यात मंड्या आणि आसपासच्या जिल्ह्यातून चारा खरेदीवरही खर्च करावा लागतो. पण पावसाळ्यात या खर्चाची काळजी घेतली जाते, कारण आम्ही आमच्या लीजवर दिलेल्या जमिनीवर चारा पिकवतो. राजेश्वरीच्या कर्तृत्वाला दोन कन्नड राज्योत्सव तालुका-स्तरीय पुरस्कार, सहा KMF तालुका-स्तरीय पुरस्कार आणि दुग्धव्यवसायातील सर्वोत्कृष्ट महिला म्हणून चार जिल्हास्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

आईकडून 10,000 रुपये घेऊन व्यवसायाची सुरुवात, आज 20000 कोटींची संपत्ती; मोदींचा 'मान्यवर'ब्रँड प्रसिद्ध

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget