एक्स्प्लोर

आईकडून 10,000 रुपये घेऊन व्यवसायाची सुरुवात, आज 20000 कोटींची संपत्ती; मोदींचा 'मान्यवर'ब्रँड प्रसिद्ध

रवी मोदी आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव आहे. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या आईकडून 10,000 रुपये घेऊन व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांची एकूण संपत्ती 20,000 कोटींहून अधिक झाली आहे.  

Success Story: यश मिळवण्यासाठी जोखीम घेणे आवश्यक आहे. तसेच प्रचंड कष्ट करण्याबरोबरच सातत्य ठेवले तर एक दिवस तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचता. आज आपण अशाच एका उद्योगपतीची गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीनं यशाचं शिखर गाठलं आहे. रवी मोदी ( Ravi Modi) असं त्याचं नाव आहे. कोलकात्यात (Kolkata) लहानाचे मोठे झालेले रवी मोदी आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव आहे. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या आईकडून 10,000 रुपये घेऊन व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांची एकूण संपत्ती 20,000 कोटींहून अधिक झाली आहे.  

रवी मोदी हे एथनिक वेअर ब्रँड मन्यावरचे संस्थापक आणि एमडी आहेत. मोदींच्या कंपनीचा ब्रँड मन्यावर हे भारतीय लग्नाच्या बाजारपेठेतील एक प्रसिद्ध नाव आहे. मोदी यांनी सुरुवातीलाच मोठे भांडवल गुंतवून आपले काम सुरू केले नाही. तर वडिलांशी वाद झाल्यानंतर आईकडून मिळालेल्या 10 हजार रुपयांतून त्यांनी व्यवसाय सुरु केला. त्यांच्या मेहनतीमुळं आज ते करोडोंच्या मालमत्तेचे मालक बनले आहेत.

रवी मोदी हे सामान्य कुटुंबातले व्यक्ती

रवी मोदी हे कोलकात्याच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेले आहेत. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेले रवी मोदी गणितात चांगले होते. त्यांचे वडील कोलकाता येथील एका मार्केटमध्ये किरकोळ दुकान चालवायचे. जिथे मोदी शिकत असताना त्यांच्या वडिलांना मदत करायचे. रवी मोदी इयत्ता दुसरीमध्ये असताना त्यांना गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले होते. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांच्यासाठी पार्टी आयोजित केली होती

सुरुवातीला सेल्समन म्हणून काम 

रवी मोदी यांच्या वडिलांचे कोलकात्यात कपड्यांचे छोटेसे दुकान होते. रवी मोदी लहानपणापासून वडिलांना मदत करायचे. वयाच्या 13 व्या वर्षापासून ते रोज दुकानात येत होते. रवी मोदी हे त्यांच्याच दुकानात सेल्समन म्हणून काम करत होते. नऊ वर्षे दुकानात काम करत असताना त्यांना विक्रीतील गुंतागुंत कळली. यादरम्यान त्यांनी कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.कॉम चे शिक्षण पूर्ण केले.

आईकडून पैसे घेऊन व्यवसायाची सुरुवात 

वडिलांसोबत भांडण झाल्यानंतर रवी यांनी आईकडून 10 हजार रुपये घेतले आणि कपडे बनवायला सुरुवात केली. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या नावावरून त्यांनी त्याचे नाव वेदांत ठेवले. त्याने भारतीय वांशिक पोशाख बनवण्यास सुरुवात केली आणि कोलकाता ते पश्चिम बंगालच्या इतर शहरांमध्ये तसेच उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि मध्य प्रदेशात विकले. त्यांनी बनवलेले कपडे चांगल्या दर्जाच्या आणि डिझाइनमुळं लोकांना आवडले. यानंतर मोदींनी आपल्या कपड्यांना 'मान्यावर' ब्रँड असे नाव दिले. बाजारपेठेसोबतच त्यांनी विशाल मेगा मार्ट आणि पँटालूनसारख्या मोठ्या दुकानांनाही लक्ष्य केले. रवी मोदी यांनी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये वेदांत फॅशनचे पहिले स्टोअर उघडले. आज त्यांची देशभरात 600 हून अधिक स्टोअर्स आहेत.

महत्वाच्या बातम्या:

पाकिस्तानमधील मुकेश अंबानी कोण? भारताशी आहे खास नातं, नेमकी किती आहे संपत्ती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
Mallikarjun Kharge : नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAaditya Thackeray Speech Dapoli | राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम महायुतीने केलं-आदित्य ठाकरेTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAaditya Thackeray Bag Checking : उद्धव ठाकरेनंतर आदित्य ठाकरे यांच्याही बॅगांची तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
Mallikarjun Kharge : नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगेवरुन पंकजा मुंडेंचा घुमजाव
मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगेवरुन पंकजा मुंडेंचा घुमजाव
Kolhapur Uttar Vidhan Sabha :  बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
बंटी पाटील कोल्हापूर उत्तरच्या वादळात 'दिवा' लावणार? काँग्रेसचे दोन अधिकृत उमेदवार देऊनही अपक्षाला पुरस्कृत करण्याची वेळ!
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी; शिर्डीत जाऊन शरद पवारांनी विखे पाटलांवर डागली तोफ
Embed widget