पतीला चालता येत नाही तर पत्नी ऐकू आणि बोलू शकत नाही, जाणून घ्या स्वावलंबी पती-पत्नीची यशोगाथा
Success Sory : पतीला दोन्ही पाय नाहीत. तर पत्नीला ऐकूही येत नाही आणि बोलताही येत नाही. अशा परिस्थितीत हे दाम्पत्य स्वावलंबी बनलं आहे.
Success Sory : सर्व संसाधने असूनही अनेकांना प्रत्येक गोष्टीत उणिवा आढळतात. ते लोक सातत्यानं काहीतरी कारणं सांगतात. पण अशा लोकांसमोर बिहारच्या बहा चौकी गावातील दिव्यांग जोडपे उदाहरण ठरले आहे. पतीला दोन्ही पाय नाहीत. याशिवाय पत्नी मूकबधिर आहे. पत्नीला ऐकूही येत नाही आणि बोलताही येत नाही. दिव्यांग असल्यामुळे या दोघांना कोणीही काम दिलं नाही. मात्र, यानंतरही त्यांनी हार न मानता स्वत:चं काम करण्याचा निर्णय घेतला. आज तो आपल्या कामातून आपल्या कुटुंबाला चांगला आधार देत आहे.
स्वयंरोजगार सुरू केला
स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकत पती-पत्नीने स्वत:चा रोजगार सुरू केला आहे. यातून मुलांचं संगोपन करत आहेत. दिव्यांग चंदन आणि त्याची पत्नी अर्चना यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर संसाराच्या जबाबदाऱ्या वाढल्या. पाय नसल्यामुळं चंदनला कोणी काम देत नव्हते. त्यांची पत्नी अर्चना स्थानिक उपजीविका गटात सामील झाली होती. अर्चनाने स्थानिक जीविका ग्रुपकडून पन्नास हजार रुपयांचे कर्ज घेतले. या पैशातून चंदनने पाच-सहा लाऊडस्पीकर विकत घेतले. जो तो घरोघरी जाऊन भाड्याने देऊ लागला. त्यामुळं त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. त्यांच्या कार्यातून लोकांना प्रेरणा मिळत आहे. तो आपल्या दोन मुलांना आणि एका मुलीला चांगल्या शाळेत शिकवत आहे.
सरकारी नोकरी मिळाली नाही
चंदन दोन्ही पायांनी 60 टक्के दिव्यांग आहे. त्यानंतरही त्यांना सरकारी नोकरी मिळाली नाही. सरकारी घोषणांनुसार आठवी उत्तीर्ण झालेल्या दिव्यांगांना सरकारी नोकऱ्या मिळतात. पण चंदनने दहावी उत्तीर्ण होऊनही त्याला नोकरी मिळाली नाही.
स्वावलंबी पती पत्नीचे सर्वत्र कौतुक
चंदन आणि अर्चना यांच्या या स्वावलंबी पती पत्नीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. दिव्यांगावर मात करत उद्योग कसा यशस्वी करायचा याचा आदर्श या दोघांनी घालून दिला आहे. आपल्यासमोर अडचींना दाद न देता त्यावर मात केली आहे. स्वत:च पती-पत्नीने स्वत:चा रोजगार सुरू केला असून मुलांचे संगोपन करत आहेत. या आलेल्या पैशातन ते आपल्या मुलांना चांगल्या दर्जाच शिक्षण देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: