(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार किंचित तेजीत; सेन्सेक्समध्ये 53, तर निफ्टी 10 अंकांनी वाढ
Stock Market Opening : सेन्सेक्स (Sensex) 53 अकांच्या तेजीसह 60,351 वर, तर निफ्टी (Nifty) 10 अंकांच्या तेजीसह 17,955 अंकांवर ट्रेड करतोय
Stock Market Opening On 19th August 2022 : भारतीय शेअर बाजारात आज काहीशा वाढीसह सरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 53 अंकांनी 60,351 वर तर निफ्टी (Nifty) 10 अंकांनी वाढून 17,955 अंकांवर व्यवहार करत आहे. .
सेक्टरमधील परिस्थिती काय?
सर्व बँकिंग, एफएमसीजी, रिअल इस्टेट क्षेत्राव्यतिरिक्त, आयटी, फार्मा, ऑटो, एनर्जी, मेटल्स, कंज्यूमर ड्यूरेबल्स, तेल आणि गॅस यांसारख्या सेक्टरला ग्राहकांची पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये चांगली वाढ होत आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्सचे दर वधारलेले आहेत, तर 19 शेअर्सच्या किमतींमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 16 शेअर्सच्या किमती वाढल्या आहेत आणि 14 शेअर्सच्या किमती घटल्या आहेत.
वधारलेले शेअर्स
वाढत्या शेअर्सवर नजर टाकल्यास, टेक महिंद्रा 1.86 टक्के, विप्रो 1.01 टक्के, कोटक महिंद्रा 0.96 टक्के, टीसीएस 0.81 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.73 टक्के, एचसीएल टेक 0.61 टक्के, इन्फोसिस 0.61 टक्के, लार्सन 0.439 टक्के, फिनसर्व्ह 0.439 टक्कांनी तेजीत आहेत.
कोणते शेअर्सच्या किमती घसरल्या?
घट झालेल्या शेअर्सवर नजर टाकली तर इंडसइंड बँक 1.32 टक्के, पॉवर ग्रिड 1.10 टक्के, एनटीपीसी 0.53 टक्के, एसबीआय 0.41 टक्के, बजाज फायनान्स 0.36 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.34 टक्के, आयटीसी 0.29 टक्के, नेस्ले 0.19 टक्के, रिलायन्स 0.19 टक्क्यांनी घसरले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :