(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Stock Market Opening : शेअर बाजाराची जोरदार सुरुवात! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला, निफ्टीची 260 अंकांची उसळी
Stock Market Opening : आज मंगळवारी भारतीय शेअर बाजाराला जोरदार सुरुवात झाली, सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांच्या उसळीसह उघडण्यात यशस्वी झाला.
Stock Market Opening : शेअर बाजाराची (Stock Market) आज जोरदार सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) 700 हून अधिक अंकांच्या उसळीने उघडला आहे. निफ्टीमध्येही (Nifty) 250 हून अधिक अंकांच्या जोरावर व्यवहार सुरू झाले आहेत. बँक, ऑटो, आयटी, मेटल, फार्मा, रिअॅल्टी या सर्व क्षेत्रांमध्ये तेजीसह मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
कितीने उघडला बाजार?
आज शेअर बाजाराची सुरुवात धमाक्याने झाली असून BSE सेन्सेक्स 717.84 अंकांच्या किंवा 1.26 टक्क्यांच्या उसळीसह 57,506 वर उघडला आहे. NSE चा निफ्टी 260.10 अंकांच्या किंवा 1.54 टक्क्यांच्या उसळीसह 17,147 वर उघडला. मात्र, पहिल्या 15 मिनिटांत बाजाराची स्थिती पाहिली, तर सेन्सेक्स 1100 अंकांनी म्हणजेच 1.94 टक्क्यांनी वाढून 57,889 वर आला आहे. दुसरीकडे, निफ्टी 321.70 अंकांनी किंवा 1.9 टक्क्यांनी वाढून 17,209 वर पोहोचला आहे.
शेअर बाजारात जबरदस्त वाढ
आजचा दिवस बघता बाजाराच्या पूर्व सुरुवातीच्या काळात, शेअर बाजारात जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे आणि सेन्सेक्स 550 अंकांनी तर निफ्टी 200 अंकांपेक्षा जास्त व्यवहार करत होता. प्री-ओपनमध्ये सेन्सेक्समध्ये 550 अंकांच्या वाढीसह 57339 ची पातळी दिसून आली. दुसरीकडे, निफ्टी 213 अंकांनी 17100 वर चढताना दिसला.
आजची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी
17200 वर असताना खरेदी, लक्ष्य 17280 स्टॉप लॉस 17150
16800 च्या खाली गेल्यास विक्री, लक्ष्य 16720 स्टॉप लॉस 16850
बँक निफ्टी वरच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा
बँक निफ्टीमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे आणि त्यातील सर्व 12 शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळत आहे. बँक निफ्टीने 39000 चा टप्पा पार केला आहे. ShareIndia चे VP हेड ऑफ रिसर्च डॉ. रवी सिंग म्हणतात की आज बँक निफ्टी वरच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.
आजची बँक निफ्टी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी
खरेदी करण्यासाठी - 38500 च्या वर गेल्यास खरेदीचे लक्ष्य 38700, स्टॉप लॉस 38400
विक्रीसाठी - 38200 च्या खाली आल्यास विक्री, 38000 स्टॉप लॉस 38300
आजच्या शेअर्समध्ये वाढ
आज सेन्सेक्सचे सर्व 30 शेअर्स उसळी घेऊन व्यवहार करत आहेत. इंडसइंड बँकेने 4.90 टक्क्यांनी उसळी घेतली. बजाज फायनान्स 3.60 टक्क्यांनी वाढला आहे. L&T 2.92 टक्क्यांनी व SBI 2.84 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. अॅक्सिस बँक 2.73 टक्क्यांनी व आयसीआयसीआय बँक 2.7 टक्क्यांनी मजबूत आहे. निफ्टीचे सर्व 50 शेअर्स वाढीच्या हिरव्या चिन्हांसह व्यवहार करत आहेत.