Stock Market Live: शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टी धोक्याच्या पातळीवर
Stock Market Live: सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीच्या (Nifty) घसरणीने सुरु झालेले शेअर मार्केटने उसळी खाल्ली असून सेन्सेक्स 47,652.53 च्या पार तर निफ्टी 13886 इतकी झाली आहे. निफ्टीमधील 11 पैकी 3 इंडेक्स धोक्याच्या पातळीपर्यंत वाढली आहेत.
Stock Market | बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आल्याने मुंबई शेअर बाजाराने एक नवा रेकॉर्ड केला आहे. सेन्सेक्सनं उसळी खाल्ली असून ती पहिल्यांदाच 47,652.53 च्या पार झाल्याचं दिसून आलंय. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुरुवातीच्या काळात घसरण झाली पण नंतरच्या काळात पुन्हा शेअर बाजाराने पुन्हा उसळी खाल्ली आणि नवा विक्रम केला.
मेटल, फार्माच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून आलंय. बँक, आयटी आणि फायनान्शिअल इंडेक्समध्ये थोड्या प्रमाणात तेजी असल्याचं दिसतंय. एचसीएल टेक आणि टेक महिन्द्रा या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीतही तेजी असल्याचं दिसतंय.
एसबीआय आणि इंडसइंड यांच्या शेअर्सच्या किंमती घसरल्या असून त्या टॉप लूजर्समध्ये आहेत. जागतिक बाजाराचा विचार केला तर अमेरिकन मार्केटमध्ये तुलनेनं मंदी आहे. पण आशियायी मार्केटमध्ये तेजी असल्याचं पहायला मिळतंय.
टॉप गेन, टॉप लूजर्स आजच्या दिवशी सेन्सेक्सच्या 12 शेअर्सच्या किंमतीत तेजी आल्याचं पहायला मिळतंय. टेक महिंद्रा, HCL टेक, कोटक महिंद्रा बँक, M&M, TCS, नेस्ले इंडिया, ONGC आणि एचयूएल या कंपन्या आजच्या दिवसाचे टॉप गेनर्स आहेत. तर इंडसइंड बँक, SBI, HDFC, अॅक्सिस बँक आणि एयरटेल या कंपन्या टॉप लूजर्स आहेत.
बँकिंगल आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आल्याने शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात तेजी आल्याचं पहायला मिळतंय. निफ्टीमधील 11 पैकी 3 इंडेक्स धोक्याच्या पातळीपर्यंत वाढली आहेत. मेटल, फार्मा या कंपन्यांचे शेअर्स आता धोक्याच्या पातळीपर्यंत वाढल्याचं तज्ंज्ञाकडून सांगण्यात येतंय.
आशियायी बाजारात तेजी बुधवारी प्रमुख आशियायी बाजारात तेजी आल्याचं दिसून आलं आहे. एसजीएक्स निफ्टी मध्ये 0.41 टक्क्यांनी तेजी आहे. स्ट्रेट टाइम्स मध्ये 0.44 टक्के आणि हॅससेंग मार्केटमध्ये 1.51 टक्क्यांनी तेजी आहे. शांघाई कंपोजिटमध्येही 0.87 टक्क्यानी शेअर मार्केट वधारलं आहे.
अमेरिकन मार्केटमध्ये घसरण मंगळवारी अमेरिकन मार्केटमध्ये घसरण पहायला मिळाली. डाऊ जॉन्स मध्ये 0.22 टक्के घसरण तर नॅसडॅकमध्ये 0.38 टक्क्यांची घसरण झाली.