एक्स्प्लोर

शेअर मार्केटमध्ये तीन दिवस शुकशुकाट राहणार; नेमकं कारण काय?

Banks, Stock Market Holiday: आज शेअर मार्केटला सुट्टी असून पुढचे दोन दिवसही शेअर मार्केट बंद राहणार आहे.

Banks, Stock Market Holiday:  आज गुड प्रायडे... नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि BSE नं दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार (Share Market) आज बंद राहणार आहेत. याचाच अर्थ असा की, तुम्ही आज म्हणजेच, 7 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारातील कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शेअर बाजाराच्या एप्रिल हॉलिडेच्या यादीनुसार, गुड फ्रायडेच्या निमित्तानं बीएसई आणि एनएसई बंद राहणार आहेत. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये बँकाही बंद राहणार आहेत. 

BSE वर दिलेल्या माहितीनुसार, आज शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. तसेच, इक्विटी सेगमेंटमध्येही व्यवहार बंद असणार आहेत. यासह, करंसी डेरिव्हेटिव्ह (Currency Derivatives) सेगमेंट देखील सस्पेंडेड असेल. दुसरीकडे, काल (गुरुवारी) बाजार बंद झाल्यानंतर एखाद्यानं इक्विटी विकली किंवा विकत घेतली असेल, तर ती दुसऱ्या दिवशी पोर्टफोलिओमध्ये जोडली जाईल.

एमसीएक्स, एनसीडीईएक्सवरही व्यवहार नाही 

कमोडीटी मार्केटही आज पूर्णपणे बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत येथेही कोणाताही व्यवहार होताना दिसणार नाही. मल्टी कमोडिटी मार्केट अंतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींत कोणताही बदल होणार नाही. 

एप्रिलमध्ये शेअर बाजाराच्या हॉलिडे लिस्टमध्ये तीन सुट्ट्या

शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार,  या वर्षी एप्रिलमध्ये शेअर बाजार तीन दिवस बंद आहेत. गुड फ्रायडे म्हणजे, एप्रिलची दुसरी सुट्टी. यापूर्वी 4 एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होतं आणि पुढील शेअर बाजाराची सुट्टी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला असणार आहे.

गुड फ्रायडेमुळे शुक्रवारी बाजार बंद असतो. अशातच पुढील 2 दिवस वीकेंड आहे. म्हणजेच, शनिवार आणि रविवारी असेल. त्यामुळे बाजारात खरेदी-विक्री होणार नाही. बाजारातील सुट्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट www.bseindia.com ला भेट देऊ शकता. डिपॉझिटरी डेटानुसार, फेब्रुवारी 2023 पर्यंत भारतात एकूण 11.25 कोटी खाती आहेत. कोरोनानंतर डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 

बाजारातील 'हा' आठवडा कसा होता? 

व्यवसायाच्या दृष्टीनं अल्पावधीत बाजारातील कामगिरी दिलासा देणारी ठरली. या कालावधीत निफ्टी आणि सेन्सेक्स सुमारे 3 टक्क्यांनी वाढले. आठवडाभर आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजी होती. दोन्ही इंडेक्स 3 टक्क्यांपर्यंत वाढले. टाटा मोटर्सचा शेअर गेल्या आठवड्यातील स्टार परफॉर्मर होता. 2023 मध्ये आतापर्यंत बाजाराची स्थिती वाईट होती. सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी घसरला. 

कोणत्या शहरात आज बँका बंद? 

आयझॉल, बेलापूर बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, हैदराबाद, आंध्र प्रदेश, इंफाळ, तेलंगणा, कानपूर, कोची, कोलकाता, उत्तर प्रदेश, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम यांसारख्या ठिकाणी गुड फ्रायडे 7 एप्रिल 2023 रोजी बँकांना सुट्टी असणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget