एक्स्प्लोर

SIP : 2025 मध्ये 1 कोटीहून अधिक SIP बंद, जून मधील आकडेवारी समोर, बाजार उच्चांकावर असताना खातं बंद करणं फायद्याचं की तोट्याचं?

SIP Closure : 2025 मध्ये 1 कोटींहून अधिक एसआयपी बंद झाल्या आहेत. ज्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार एसआयपी थांबवणं चुकीचं ठरु शकतं. 

मुंबई : एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत आता लोकप्रिय झाली आहे. अनेक जण एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, 2025 मध्ये एसआयपी बंद होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुच्युअल फंड गुंतवणूकदार एसआयपी बंद करुन बाहेर पडत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस इन इंडियाच्या आकडेवाीरनुसार या वर्षात 1 कोटींहून अधिक एसआयपी खाती बंद झाली आहेत. 

जून  2025 मध्ये 48 लाख एसआयपी खाती बंद झाली किंवा मॅच्युअर झाली आहेत. यामुळं एसआयपी स्टॉपेज रेशो 77.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. वॅल्यू रिसर्चच्या रिपोर्ट नुसार ही आकडेवारी महत्त्वाची आहे. कारण जितकी एसआयपी खाती सुरु झाली तितकीच खाती बंद होत आहेत. 

जूनमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्यात आलेली रक्कम 27269 कोटी रुपयांच्या उच्चांकवर पोहोचलेली आहे. एसआयपी खात्यांची जून महिन्यातील संख्या 9.19 कोटी झाली आहे. मेमधील खात्यांची संख्या 9.06 कोटी होती. जून महिन्यात 8.64 कोटी  एसआयपी खात्यातून गुंतवणूक झाली. मे महिन्यात ही संख्या 8.56 कोटी होती. 

एसआयपी स्टॉपेज रेशोच्या आकडेवारीनुसार जितकी खाती बंद झाली तितकी नवी खाती सुरु झाली आहेत.  तज्ज्ञांच्या मते याचा हा अर्थ नाही की गुंतवणूकदार बाजाराच्या बाहेर जात आहेत. काही एसआयपी  मॅच्युअर होत आहेत. तर, काही खाती तांत्रिक कारणांमुळं बंद होत आहेत. 

Lemonn Markets च्या गौरव गर्ग  यांच्या मते बाजारातील उच्च मूल्यांकनामुळं गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे. हाय वॅल्यूएशनच्या भीतीमुळं काही एसआयपी खाती बंद होत आहेत. मात्र, डेटानुसार दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरते. 

Fin Edge चे सह संस्थापक आणि सीईओ हर्ष गहलोत यांनी एसआयपीबाबत सतर्क केलं आहे. जेव्हा मार्केट उच्चांकावर असताना एसआयपी बंद करण योग्य वाटू शकतं. मात्र, दीर्घकालीन विचार करता ते नुकसान करणारं  ठरू शकतं. एसआयपीचा उद्देश सातत्यानं गुंतवणूक करणं हा आहे. 

एसआयपी सुरु करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

एसआयपीचा खरा फायदा कम्पाऊंडिंग आणि रुपी कॉस्ट अवरेजिंगद्वारे मिळतो. जो वेळेनुसार वाढत असतो. एसआयपीचा वेळ 5-10 वर्ष असावा. एसआयपीचा उद्देश तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक करणं हा नव्हे तर मार्केटच्या प्रत्येक स्थितीत गुंतवणूक करणं हा आहे.  तुमच्या जोखीम क्षमतेनुसार, किती रक्कम उभारायची आहे, यानुसार इक्विटी, हायब्रिड आणि डेट फंड निवडावा. संशोधन करुनच फंड निवडावा. कोणत्याही फंडाची जुनी कामगिरी पाहावी मात्र ती भविष्याची गॅरंटी नसते. एसआयपी सुरु केल्यानंतर प्रत्येक वर्षी आढावा घेणं महत्त्वाचं आहे. 
 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Embed widget