एक्स्प्लोर

चांदीच्या दरानं घातला धुमाकूळ! दरात आत्तापर्यंतची विक्रमी वाढ, 1 किलोसाठी किती द्यावे लागतात पैसे? जाणून घ्या सविस्तर माहिती  

दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. या दरामुळं नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ लागत आहे. या वर्षी सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

Silver Price News : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. या दरामुळं नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ लागत आहे. या वर्षी सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, दिल्लीत चांदीच्या किमतीत यावर्षी 82 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या काही दशकांमध्ये पहिल्यांदाच चांदीच्या किमतीत इतकी लक्षणीय वाढ झाली आहे.

चालू आठवड्यात चांदीच्या किंमती 6,000 हून अधिक वाढल्या

सध्या दिल्लीच्या बाजारपेठेत चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं दिसतच आहे. चालू आठवड्यात चांदीच्या किंमती 6,000 किंवा त्याहून अधिक वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. चांदीच्या किंमती वाढण्याची प्राथमिक कारणे म्हणजे वाढती औद्योगिक मागणी आणि भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता. दरम्यान, फेडरल रिझर्व्ह येत्या काही दिवसांत व्याजदर कपातीची घोषणा करु शकते, ज्यामुळे चांदीच्या किमतींना आधार मिळत असल्याचे दिसून येते. दरम्यान, दिल्लीतील सोन्याच्या किमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. सध्या  चांदीचे दर प्रतिकिलो 1 लाख 63 हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. 

चांदीच्या किंमतीत विक्रमी वाढ

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी चांदीच्या किमती 6000 रुपयांनी वाढल्या आहेत. सध्या चांदीची किंमत 1 लाख 63 हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असताना, जागतिक बाजारात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून त्याची खरेदी वाढली. एका आठवड्यातील चांदीच्या किमतीत ही दुसरी मोठी वाढ आहे. 6 ऑक्टोबर रोजी ती 7400 रुपयांनी वाढून 1 लाख 57 हजार 400 रुपये प्रति किलोग्रॅमवर ​​पोहोचली. यामुळे या आठवड्यात चांदीच्या किमतीत 13000 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी चांदीचे दर 1 लाख 50 हजार रुपये होते. चालू वर्षाच्या दृष्टीने सोन्याच्या किमती 73 300 रुपयांनी किंवा 82 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या शेवटच्या व्यापारी दिवशी चांदीचे दर 89700 रुपयांवर पोहोचले. 

दिल्लीत सोन्याचे दर काय?

दिल्लीत सोन्याचे दर कायम राहिलेत. स्थानिक सराफा बाजारात, गुरुवारी 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेचे सोने अनुक्रमे 1 लाख 26 हजार 600 रुपये आणि 1 लाख 26 हजार प्रति 10 ग्रॅम (सर्व करांसह) या त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर अपरिवर्तित राहिले. चालू महिन्यात सोन्याच्या किमती 6 हजार 600 रुपयांनी वाढल्या आहेत, तर यावर्षी सोन्याच्या किमती 47 हजार 650 प्रति 10 ग्रॅमने वाढल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Gold Prices Today: सोन्या- चांदीची आवाक्याबाहेर भरारी! 10 ग्रॅम सोन्याचे दर बघून तोंडचे पाणी पळाले, किती पैसे मोजावे लागतायत?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Tussle: 'मुंबईचा महापौर खान होईल', BMC जागावाटपावरून महायुतीत नवा वाद Special Report
BJP Office Mumbai : भाजप कार्यालय भूमीपूजनावरून वाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी Special Report
Zero Hour'मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही', Bacchu Kadu यांचा थेट CM Fadnavis यांना इशारा
Pune Land Row: पुणे जैन बोर्डिंग वाद: मोहोळ-धंगेकर लढाईत नवा पेच Special Report
Sushma Andhare on Nimbalkar : ४८ तासांत माफी मागा', Nimbalkar यांची Andhare यांना ५० कोटींची नोटीस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
Embed widget