एक्स्प्लोर

Gold Prices Today: सोन्या- चांदीची आवाक्याबाहेर भरारी! 10 ग्रॅम सोन्याचे दर बघून तोंडचे पाणी पळाले, किती पैसे मोजावे लागतायत?

किमती वाढल्यामुळे जागतिक पातळीवर मागणीत घट झाली आहे. दागिन्यांच्या बाजारपेठेत ग्राहक वेट अँड वॉच भूमिकेत असल्याचेच दिसत आहेत. 

Gold price: सोने आणि चांदीच्या दराने सध्या टोक गाठले आहे. सण समारंभाच्या तोंडावर वाढलेल्या दरामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर सव्वा लाखांच्या घरात जाताना दिसत आहे. आज (9 ऑक्टोबर ) 1 लाख 22 हजार 810 रुपयांवर 24 कॅरेट सोन्याचा भाव पोहोचला आहे. तर एक किलो चांदीसाठी एक लाख 48 हजार 940 रुपये मोजावे लागत आहेत.  दरम्यान, जळगावच्या सुवर्णनगरीत (Jalgaon) गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे.  जळगावात सोन्याचे दर 1 लाख 23 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम तर जीएसटीसह एक लाख 26 हजार 700 रुपयांवर जाऊन ठेपलाय. (Gold Silver Rates Today)

सोन्याच्या भावाचा ट्रेंड चढता राहणार? 

तज्ञांच्या मते सध्या जागतिक भूराजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जगभरातील तज्ञ सोन्या- चांदीच्या या चढ्या ट्रेंडमागे अमेरिकेने केलेलं शटडाऊन प्रमुख कारण ठरल्याचं सांगितलं आहे.  किमती वाढल्यामुळे जागतिक पातळीवर मागणीत घट झाली आहे. दागिन्यांच्या बाजारपेठेत ग्राहक वेट अँड वॉच भूमिकेत असल्याचेच दिसत आहेत. 

आज कोणत्या शहरात सोने कितीवर? 

इंडियन बुलियन असोसिएशननुसार, आज नवी दिल्ली मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव एक लाख 22 हजार 690 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीची किंमत एक लाख 48 हजार 840 रुपये प्रति किलो झाली आहे.  22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 12 हजार 466 रुपये असून तोळ्यामागे 1लाख 31 हजार 178 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई, पुण्यात 24 कॅरेट सोन्याला 122,950 रुपये मोजावे लागत आहेत. 

या वाढीमागे जागतिक आणि आर्थिक परिस्थितीचा मोठा प्रभाव असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. सध्या रशिया-युक्रेन युद्ध, इजरायल-गाझा संघर्ष आणि अमेरिकन फेडरल बँकेकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता यासारख्या घटनांमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे लक्ष वेधले आहे. यामुळे मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढले आहेत.

जळगावात सोनं महागलं,  सुनील बाफना म्हणाले... 

बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना म्हणाले, “गेल्या काही दिवसांत जागतिक घडामोडी आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे लोक सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. पुढील काळातही हा वाढीचा ट्रेंड सुरू राहण्याची शक्यता आहे.” सोन्याच्या दरातील सतत वाढ लक्षात घेतल्यास, आर्थिकदृष्ट्या विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा काळ सोन्यात गुंतवणुकीसाठी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरातील ही हालचाल नोंदवून गुंतवणूकदारांनी योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
Embed widget