एक्स्प्लोर

औषधं महागणार, बँकेचे नियमही बदलणार; जाणून घ्या उद्यापासून काय बदल होणार?

Changes from 1st April 2022 : एक एप्रिल 2022 अर्थात उद्यापासून आर्थिकदृष्ट्या बदल होणार आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशांवर होणार आहे.

Changes from 1st April 2022 : उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या महिन्यात काही मोठे बदल होणार आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. औषधांचे दर वाढणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीवर असलेली विशेष सवलतही बंद होणार आहे. इंधर दरवाढीचा चटके सहन करणाऱ्यांना गॅस दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे. 

>> उद्यापासून काय होणार बदल, जाणून घ्या

> औषधांचे दर वाढणार 

1 एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. जवळपास 800 औषधांच्या किंमती वाढणार आहे. 

> पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना धक्का

1 एप्रिल 2022 पासून पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना आयकर कायद्याच्या कलम 80EEA अंतर्गत मिळणारा लाभ केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

> गॅस दर वाढ होणार?

मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली होती. इंधन दरवाढ सुरू असताना  आता घरगुती एलपीजी गॅस दरवाढीची झळ ग्राहकांना बसू शकते. एक एप्रिल रोजी नवीन दर जाहीर होण्याची शक्यता आहे. 

> पोस्ट ऑफिसच्या नियमांत बदल

1 एप्रिल 2022 पासून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यात उपलब्ध असतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केले आहे.

> म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे चेक, बँक ड्राफ्ट किंवा रोखीने देता येणार नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला युपीआय अथवा नेटबँकिंगचा वापर करावा लागणार आहे. 

> पीएफ खात्यावर कर

एक एप्रिल 2022 पासून विद्यमान पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते. त्यावर कर आकारणी होऊ शकते. ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात आहे. शासकीय  कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.

> जीएसटी नियमात बदल

CBIC (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ) ने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्याची उलाढाल मर्यादा 50 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून 20 कोटी रुपये केली आहे. 

> ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीचा विशेष लाभ बंद?

कोरोना काळात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक लाभ मिळत होता. आता काही बँका या योजना बंद करण्याची शक्यता आहे. 

> क्रिप्टोकरन्सीवर 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू

क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागू होणार आहे. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) किंवा क्रिप्टोकरन्सी विकून मिळालेल्या नफ्यावर 30 टक्के कर लागणार आहे. 

> अॅक्सिस बँक आणि पीएनबीच्या नियमांत बदल

अॅक्सिस बँकेच्या सॅलरी आणि बचत खात्यावरील नियमात बदल होणार आहे. बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लक रक्कम 10 हजारांहून 12 हजार केली आहे. बँकेने मोफत व्यवहाराची मर्यादा चार अथवा 1.5 लाख रुपये इतकी केली आहे.  त्याशिवाय, पीएनबी बँकेनेदेखील 4 एप्रिलपासून पीपीएस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 10 लाख रुपये आणि त्यावरील धनादेशांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07 AM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 6.30 PM TOP Headlines 06.30 PM 29 March 2025Myanmar Earthquake : म्यानमार, थाडलंडमध्ये 'महाभूकंप' अनेक इमारती जमीनदोस्त, पूलही कोसळलेSpecial Report | Disha Salian | वडिलांचं अफेअर, मृत्यूचं कारण? दिशाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
Embed widget