50 कोटीच्या घरात राहणाऱ्या, 20 लाखांचे शूज वापरणाऱ्या नमिता थापर आहेत तरी कोण?
Namita Thapar : शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात जज असणाऱ्या नमिता थापर यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कारण त्या तब्बल 20 लाख रुपयांचे शूज वापरत आहेत.
![50 कोटीच्या घरात राहणाऱ्या, 20 लाखांचे शूज वापरणाऱ्या नमिता थापर आहेत तरी कोण? Shark Tank India judge Namita Thapar has a wealth of 600 crores Namita Thapars shoes cost Rs 20 lakhs 50 कोटीच्या घरात राहणाऱ्या, 20 लाखांचे शूज वापरणाऱ्या नमिता थापर आहेत तरी कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/c8c39856a497e404720b30649e629b311710474507817339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Namita Thapar : सध्या देशात 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रम लोकप्रिय होत आहे. अमेरिकन रिअॅलिटी कार्यक्रमावर आधारीत असलेला हा कार्यक्रम भारतात 'शार्क टँक इंडिया' या नावाने प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात असणाऱ्या एका महिला जजची सध्या जोरदार चर्चा होत आहे. नमिता थापर (Namita Thapar) असं त्याचं नाव आहे. त्यांचे शूजची किंमत 20 लाख रुपये आहे. तर त्यांच्याकडे 50 कोटी रुपयांचा अलिशान बंगला देखील आहे. तसेच करोडो रुपयांच्या गाड्या देखील त्यांच्याकडे आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती.
एखादा व्यक्ती महागात महाग 10 ते 20 हजार रुपयांचे शूज घालू शकतो. पण शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात जज असणाऱ्या नमिता थापर यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कारण त्या तब्बल 20 लाख रुपयांचे शूज वापरत आहेत. तर त्या 50 कोटींच्या बंगल्यात राहत असून करोडो रुपयांच्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. यावरुन त्यांच्याकडे किती संपत्ती असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.
कोण आहेत नमिता थापर?
नमिता थापर या Emcure Pharmaceuticals या आंतरराष्ट्रीय औषधाच्या कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरु केला होता. तसेच इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडच्या संस्थापक आणि सीईओ देखील आहे. यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. अलिशान राहणीमाण असणाऱ्या नमिता थापर यांच्याकडे मोठी संपत्ती आहे. शार्क टँक इंडिया कार्यक्रमात त्यांच्याबरोबर असलेल्या एका जजने त्यांनी 20 लाख रुपयांचा शूज घातल्याची माहिती दिली. त्यानंतर नमिता थापर यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. नमिता थापर यांच्याकडे BMW X7, Mercedes-Benz GLE, Audi Q7 अशा करोडो रुपयांच्या महागड्या गाड्या आहेत. नमिता थापर यांचा जन्म 1973 मध्ये भारतात झाला आहे. त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून कला शाखेची पदवी पूर्ण केली आहे. त्यांनतर त्यांनी युनायटेड किंगडमच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून एमबीए चं शिक्षण पूर्ण केलं.
नमिता थापर यांच्याकडे किती संपत्ती?
नमिता थापर यांच्याकडे मोठी संपत्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार थापर यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे. त्या पुण्यात राहतात. त्यांच्याकडे 50 कोटी रुपयांचा 5000 स्क्वेअर फुटाचा अलिशान बंगला आहे. नमिता थापर यांनी शार्क टँक इंडिया कार्यक्रमात आलेल्या 25 कंपन्यांमध्ये 10 कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक केलीय.
महत्वाच्या बातम्या:
Shark Tank India 2 : व्यायामाशिवाय बारिक होण्याच्या प्लॅन ऐकूण Namita Thapar ला राग अनावर; नेमकं प्रकरण काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)