Shark Tank India 2 : व्यायामाशिवाय बारिक होण्याच्या प्लॅन ऐकूण Namita Thapar ला राग अनावर; नेमकं प्रकरण काय?
Shark Tank India Season 2 : 'शार्क टॅंक इंडिया 2'च्या नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये एका प्लॅनने नमिता थापर (Namita Thapar) आश्चर्यचकित झालेली दिसून आली.
Shark Tank India Season 2 : 'शार्क टॅंक इंडिया' (Shark Tank India 2) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील पहिल्या पर्वाप्रमाणे दुसरं पर्वदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योजक वेगवेगळ्या कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये एका उद्योजकाने नमिता थापरला (Namita Thapar) आश्चर्यचकित केलं आहे.
'शार्क टॅंक इंडिया'च्या (Shark Tank India 2) नुकत्याच पार पडलेल्या एका भागात एक उद्योजिका आल्या होत्या. वेट लॉस संबंधित त्यांचा व्यावसाय होता. व्यायामाशिवाय बारिक कसं व्हायचं याचा डाएट प्लॅन त्या बनवतात. पण व्यायामाशिवाय बारिक कसं होणार या मुद्द्यावर नमिता त्या उद्योजिकेवर भडकलेल्या दिसून आल्या.
नमिता थापरला राग अनावर
अमनने उद्योजिकेला प्रश्न विचारला,"तुम्ही एकदा डाएट प्लॅन बनवला की पुन्हा तुमच्याकडे येण्याची आवश्यकता नाही." यावर उत्तर देत उद्योजिका म्हणाल्या,"यात एक गंमत आहे. लोकांमध्ये डाएट प्लॅन असतानाही त्याना तो 'री-स्टार्ट' करण्यासाठी आमची गरज लागेल". नमिता थापरला 'री-स्टार्ट' हा शब्द खटकतो. ती म्हणते,"री-स्टार्ट हा प्रकारच चुकीचा आहे. व्यायाम न करता बारिक होणं हे मला पटत नाही".
View this post on Instagram
नमिता थापर त्या उद्योजकाला म्हणाल्या,"वजन कमी करणे हा जीवनशैलीचा भाग असायला हवा. मधुमेह आणि रक्तदाबापासून दूर राहण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. देशात आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांची वाढ होत आहे. नमिता थापरदेखील बॉडी शेमची शिकार झाली होती. 'शार्क टॅंक इंडिया'च्या दुसऱ्या भागात तिने सांगितलं होतं की तिला 'जाडी' म्हणून आवाज देत असे.
'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या बिझनेस आयडिया घेऊन येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. या शोमधील परीक्षक हे शोमध्ये येणाऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या आयडिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जर त्या व्यक्तीची कल्पना परीक्षकांना आवडली तर ते त्या व्यक्तीच्या व्यवसायासाठी मदत करतात, असा हा कार्यक्रम आहे.
संबंधित बातम्या